शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अधिकायांनी केली शौचालये स्वच्छ, सफाई कामगारांची स्वच्छतागृहे झाली लख्ख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:44 IST

संपूर्ण शहर साफ करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, अशा सफाई कामगारांचा सोमवारचा दिवस मात्र वेगळा ठरला.

ठाणे : संपूर्ण शहर साफ करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, अशा सफाई कामगारांचा सोमवारचा दिवस मात्र वेगळा ठरला. एरव्ही, केवळ आदेश देणा-या पालिकेच्या अधिका-यांनी चक्क शौचालय साफ करण्याची जबाबदारी उचलल्याने सफाई कामगारांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. स्वच्छतेबरोबरच त्यांना दैनंदिन कामामध्ये येणा-या अडचणी समजून घेणे, हा मोहिमेचा हेतू होता.आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मोहिमेमध्ये अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, उपायुक्त मनीष जोशी तसेच सहायक आयुक्त मारु ती गायकवाड यांनी खारटन रोड येथील स्वत: १६ टॉयलेट सीट साफ केले. स्वच्छ अभियानाचा एक भाग म्हणून शहरातील महत्त्वाची ठिकाणे साफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यापुढे जाऊन आयुक्तांनी ही अनोखी संकल्पना मांडली. अशी ठिकाणे साफ झालीच पाहिजे. मात्र, शहरातील वस्ती आणि सार्वजनिक शौचालये साफ झाली, तर खºया अर्थाने सफाईचा उद्देश साध्य होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.मुंब्य्रामध्ये बाबाजी पाटीलवाडी येथे दोन आठवड्यांपूर्वी अशी संकल्पना राबवली होती. त्यानंतर, सोमवारी नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत असलेल्या खारटन रोड परिसरात सकाळी मोहीम राबवण्यात आली. खारटन रोड परिसर हा संपूर्ण सफाई कामगारांचा रहिवासी परिसर असल्याने या ठिकाणची निवड करण्यात आली. या मोहिमेदरम्यान सफाई कर्मचाºयांना कोणत्या अडचणी येतात, त्या समजून घेण्यात आल्या. विशेषकरून या कर्मचाºयांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याने कामे करण्यात अडचणी येत आहेत. तसेच जे पाणी मिळत आहे, त्यात काही प्रमाणात घातक रसायनाचे घटक असल्याचे अधिकाºयांच्या या वेळी लक्षात आले. या सर्व अडचणी सोडवण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे आश्वासन या अधिकाºयांनी दिले. अधिकाºयांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे सफाई कर्मचाºयांनी समाधान व्यक्त केले.जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सेना ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी स्वच्छता अभियानांतर्गत वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव स्वच्छ करण्यात आला. सकाळी ८.३० वाजल्यापासून सुरू झालेल्या या अभियानात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेनेचे विविध नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी श्रमदान करून संपूर्ण रायलादेवी तलाव आणि परिसर स्वच्छ केला. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्रीसेवकांनीही या अभियानात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ठाणे महापालिका स्वच्छता अभियानांतर्गत प्रभाग-१२ मधील कचराळी तलाव परिसर व भोला भय्या चाळ, चंदनवाडी येथील परिसर खासदार राजन विचारे, नगरसेविका नंदिनी विचारे, रुचिता मोरे आदींनी स्वच्छ केला.