शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियोजित जागेची अधिकाऱ्यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 23:27 IST

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी छाया उपजिल्हा रुग्णालय, उल्हासनगर येथील सरकारी मध्यवर्ती रुग्णालयाचीही पाहणी केली.

अंबरनाथ :  पूर्व भागातील २६ एकर सरकारी जागेवर ठाणे जिल्ह्याकरिता वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे याकरिता वैद्यकीय शिक्षण विभागाच्या चार वरीष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. सोमवारी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियोजित जागेची पाहणी सहसंचालक डॉ. चंदनवाले यांनी केली. त्याबाबतचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी छाया उपजिल्हा रुग्णालय, उल्हासनगर येथील सरकारी मध्यवर्ती रुग्णालयाचीही पाहणी केली.अंबरनाथ नगरपालिका हद्दीत ‌‌‌वैद्यकीय कॉलेज उभारण्याबाबत राज्य सरकारने प्रस्ताव तयार करण्याची मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यात आली. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली. ही जागा शेतकी सोसायटीच्या अंतर्गत असून त्या जागेवर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी कार्यवाही करणे गरजेचे असल्याने या जागेचे हस्तांतरण करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. अंबरनाथ नगरपालिका हद्दीत ही जागा असून या जागेबाबत योग्य अहवाल सादर करणे गरजेचे आहे. त्यामुळे पालिकेच्या नगरविकास विभागाच्या या अधिकाऱ्यांनीही या जागेबाबत पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार किणीकर यांनी दिल्या. यावेळी प्रांत अधिकारी जयराज कारभारी, तहसीलदार जयराज देशमुख, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, शहर संघटक सुनील चौधरी, उपशहरप्रमुख सुभाष साळुंखे, तुळशीराम चौधरी, छाया हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिष पाटोळे आदी उपस्थित होते.