शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा कार्यालयात पदाधिकाऱ्यांचा धिंगाणा

By admin | Updated: February 16, 2017 10:58 IST

भाजपाच्या मीरा रोड येथील कार्यालयात प्रेमगीतांवर बेधुंद थिरकणाऱ्या भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने

मीरा रोड : भाजपाच्या मीरा रोड येथील कार्यालयात प्रेमगीतांवर बेधुंद थिरकणाऱ्या भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. व्हॅलेंटाइन डे निमित्ताने हा धिंगाणा घातल्याचे मेसेज पसरले असले, तरी एका महिला पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त नाचगाणी सुरू असल्याचे भाजपाचे म्हणणे आहे. भाजपाची व्हॅलेंटाइन मस्ती, स्वत:ला शिस्तप्रिय व संस्कारी म्हणवणाऱ्या भाजपामध्ये महिलांना असे नाचवले जाते का? त्या नाचायला व मस्ती करायला येतात का? असे सवाल सोशल मीडियावर विचारले जाऊ लागले. मीरा रोडच्या कनकिया परिसरात भैरव रेसिडेन्सी इमारतीत कार्यालय आहे. हा व्हिडीओ हा त्याच कार्यालयातील आहे. त्यामध्ये भाजपाच्या पदाधिकारी काजल सक्सेना, सोनिया नायक, प्रेमचंद, स्वाती भन्साळी, सौजन्या, राज पाठक यांची नावे चर्चेत आहेत. भाजपा आमदार नरेंद्र मेहता हे स्वत: या भागातील नगरसेवक असून त्यांनी मात्र हा कार्यक्रम व्हॅलेंटाइन डे चा नसल्याचे सांगितले. काही भाजपा कार्यालयांत कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याच्या निमित्ताने वाढदिवस साजरे केले जातात. सोमवारी सोनिया नायक यांचा वाढदिवस साजरा केला. सर्व प्रमुख निघून गेल्यावर काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात हा प्रकार केला. या प्रकरणी ५ ते ६ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आम्ही घेतले आहेत. त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येणार आहे असे मेहता म्हणाले. दरम्यान, वरिष्ठ नेते यावर कुठला निर्णय घेतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनीही झालेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला असून कारवाईची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)