शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका उद्यानातील एलईडी टीव्हीवर लावला अश्लिल चित्रपट

By सदानंद नाईक | Updated: January 27, 2024 17:32 IST

पोलिसात तक्रार अल्पवयीन मुलाचे कृत्य

उल्हासनगर : महापालिकेने पर्यावरण विषयक माहिती देण्यासाठी सपना गार्डन येथील एलईडी टीव्ही क्रिनवर २३ जानेवारी रोजी रात्री चक्क ब्ल्यू फिल्म सुरू झाल्याने, एकच खळबळ उडाली. स्थानिक नगरसेवक मनोज लासी यांना जागृत नागरिकांनी माहिती दिल्यावर, लासी यांनी महापालिका अधिकाऱ्याला माहिती देताच एलईडी टीव्ही बंद करण्यात आली.

 उल्हासनगर महापालिकेने नागरिकांना पर्यावरण बाबत माहिती देण्यासाठी शहरातील सपना गार्डनसह एकून ८ ठिकाणी एलईडी क्रिन टीव्ही लावण्यात आले आहे. सपना गार्डन येथील एलईडी टीव्हीवर २३ जानेवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान ब्ल्यू फिल्म सुरू झाली. अश्लील फिल्म सुरू होताच महिला व मुलींनी येथून काढता पाय घेतला. तर नागरिकांनी संताप व्यक्त केला. एका जागृत नागरिकांनी स्थानिक नगरसेवक मनोज लासी यांना हा प्रकार सांगितल्यावर, त्यांनाही धक्का बसला. त्यांनी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांना फोन करून माहिती दिली. त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देताच, सपना गार्डन येथील एलईडी टीव्ही क्रिन बंद केली. त्यामुळे नागरिकांत निर्माण झालेला संताप थांबला.

 महापालिका उपायुक्त डॉ सुभाष जाधव व पर्यावरण विभागाच्या प्रमुख विशाखा सावंत यांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपासाचे चक्र फिरविले असता, एका अल्पवयीन मुलाने एलईडी टीव्हीला छेडछाड करून ब्ल्यू फिल्म सुरू केल्याचे उघड झाले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. या प्रकारानंतर महापालिकेने एकून ८ ठिकाणी लावलेले एलईडी टीव्हीचे प्रक्षेपण थांबविले आहे. 

पालकांनो मुलांना सांभाळा... अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर पालक कोणतीही काळजी न घेता मुलांच्या हातात मोबाईल देत असल्याने, मुलांना वेगळाच छंद लागण्याची भीती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी महापालिका गार्डन येथील एलईडी टीव्ही क्रिनवर लागलेल्या ब्ल्यू फिल्म प्रकारानंतर व्यक्त केली. मुलांच्या हातात मोबाईल दिल्यावर मुले त्याचा वापर कशा करतात. याकडे पालकांनी विशेष लक्ष द्यायला हवे. नाहीतर असे प्रकार घडत राहणार आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर