शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

केडीएमसीत नर्सचे ठिय्या आंदोलन;पगारवाढीच्या लेखी हमीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 01:19 IST

एनयूएचएममधील १९२ नर्स कल्याण-डोंबिवलीत २०१५ पासून कार्यरत आहे. दर महिन्याला त्यांना आठ हजार ६४० रुपये पगार दिला जातो.

कल्याण : ‘नॅशनल अर्बन हेल्थ मिशन’(एनयूएचएम) मधील १९२ नर्सनी किमान वेतन दिले जात नसल्याने मंगळवारपासून केडीएमसी मुख्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पगारवाढीचे लेखी आश्वासन द्या; अन्यथा कामावर हजर होणार नाही, असा इशारा या नर्सनी दिला आहे. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत त्यांनी आंदोलन मागे घेतलेले नव्हते.

एनयूएचएममधील १९२ नर्स कल्याण-डोंबिवलीत २०१५ पासून कार्यरत आहे. दर महिन्याला त्यांना आठ हजार ६४० रुपये पगार दिला जातो. अन्य महापालिकांमध्ये हेच काम करणाऱ्यांना किमान वेतन, वैद्यकीय भत्ते तर, सध्या कोविड भत्ता दिला जात आहे. मात्र, केडीएमसीतील या नर्सना किमान वेतन, सुरक्षेची साधने व कोविड भत्ताही दिला जात नाही. सध्या या नर्स वैद्यकीय सेवा देत आहेत. साप्ताहिक सुटीही त्यांना घेऊ दिली जात नाही. याप्रकरणी दाद मागण्यासाठी त्यांनी सोमवारी महापालिका मुख्यालयात धाव घेतली होती. रात्री ८ वाजेपर्यंत त्यांची आयुक्तांशी भेट न झाल्याने त्या पुन्हा मंगळवारी महापालिका मुख्यालयात आल्या. मात्र, महापालिकेकडून लेखी आश्वासन न मिळाल्याने त्यांनी ठिय्या धरला.

दरम्यान, राष्ट्रीय अभियान संचालनालयाचे आयुक्त अनुप कुमार यादवी यांच्या सहीची एक नोटीस त्यांना दिली गेली आहे. कोविड साथ काळात अभियानांर्गत काम करणाºया वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहणे आवश्यक आहे. ४८ तासांत हे कर्मचारी हजर न झाल्यास त्यांच्याविरोधात कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. मात्र, ही नोटीस १४ मे २०२० ला काढलेली आहे. त्याच नोटिशीच्या आधारे कारवाईची तंबी महापालिका देण्याच्या तयारीत आहे. मात्र, अद्याप नोटीस काढलेली नाही.आयुक्तांशी केली चर्चाभाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आंदोलनकर्त्या नर्सची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, याविषयी आयुक्तांशी चर्चा केली आहे. कोविडप्रमाणे त्यांना वेतन देण्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे. त्याची लेखी आॅर्डर काढली जाईल, असे त्यांनी आश्वासित केले आहे.किमान वेतन देण्याचा विचार करणारआयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, यासंदर्भात बैठक घेतली आहे. कोविड काळात त्यांना अन्य नर्सेसच्या तुलनेत मानधन वाढवून देण्यात येईल; तसेच त्यांना किमान वेतन देण्याचा विचार केला जाईल.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका