शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

कोरोनावर उपचार करणाऱ्या परिचारिकेचीे पैशांसाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 15:06 IST

कोरोना बाधीत रुग्णांची सेवा करता करता एका वैद्यकीय सेवा देणाऱ्या  महिला कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण झाली आहे. तिच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु आधी पैसे भरा मगच उपचार करु असा तगादा या रुग्णालयाकडून महिलेकडे लावला जात आहे.

ठाणे : ज्या परिचारिकेने स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्त रु ग्णांची सेवा केली. तिच्यावरच कोरोनाग्रस्त होण्याची वेळ आली. तिच्यावरील हे संकट एवढ्यावरच थांबले नाही, तर तिच्यावरील उपचाराचे भले मोठे बिलही तिच्या हातात दिले. रु ग्णांची सेवा करणाºया या कोरोना योद्धीकडे स्वत:वरील उपचाराचे बिल देण्याएवढेही पैसे नव्हते. परंतु माणुसकी नसलेल्या रु ग्णालयाने तेही माफ करण्यास असमर्थता दर्शविल्याने अखेर इतर कर्मचाऱ्यांनी वर्गणी गोळा करून त्या रु ग्णालयाची अनामत रक्कम भरली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.                      लोकमान्यनगर भागात राहणारी एक महिला ठाणे महानगर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात वैद्यकीय कर्मचारी या पदावर काम करते. दुर्दैवाने रु ग्णालयात सेवा बजावत असतानाच कोरोनाबधित रु ग्णाच्या संपर्कात आल्याने तिलाही कोरोनाची लागण झाली. त्यामुळे पालिकेने घोषित केलेल्या ठाणे पाचपाखडी येथील एका खासगी रु ग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले. गेले चार दिवस या रु ग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करताच तिच्याकडून रु ग्णालय प्रशासनाने अनामत रक्कम म्हणून २४ हजार रु पये भरण्यासाठी सांगितले. तिच्याजवळ ते नसल्याने काही दिवसांनी बंदोबस्त करून भरते असे तिने सांगितले. मात्र रु ग्णालय प्रशासन रोज तिच्याकडे अनामत रक्कम भरण्यासाठी तगादा लावत असल्याने या अवस्थेतही कोरोना बाधित परिचारिकेने तिच्या मैत्रिणीकडून कर्ज काढून काहींकडून वर्गणी जमा करून रु ग्णालयाने मागितलेली अनामत रक्कम भरली आहे. मात्र कोरोना बाधित रु ग्णाला सगळ्यात जास्त मानसिक आधाराची गरज असताना पैशांसाठी तिच्यामागे तगादा लावणे हे एका प्रकारे रु ग्णाचा छळच असल्याचे कामगार नेते रवी राव यांचे म्हणणे आहे. परिचारिकेवर उपचार सुरू असून तिच्यावरील उपचाराचे बिल लाखाच्या घरात गेले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.दरम्यान ज्या रु ग्णालयात कोरोना बाधित परिचारिकेचा उपचार सुरू आहे. त्या रु ग्णालय व्यवस्थापकांनी ठाणे महानगर पालिकेकडून अनेक सुविधा लातल्या आहेत. ट्रस्ट दाखवून पालिका आणि सरकारकडून सवलती मिळविल्या आहेत. गरिबांसाठी या रु ग्णालयात २० टक्के बेडस उपलब्ध करून देणार असल्याचे बंधनकारक असतानाही रु ग्णलाय व्यवस्थापकांकडून नियम भंग केला जात आहे. जनसेवा करणाºया कर्मचाºयांवर जनता फुलांचा वर्षाव करून आणि टाळ्या वाजवून लोक अशा अत्यावश्यक सेवा करणाºयांचे आभार व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे असे खासगी रु ग्णालये त्यांची लूट करीत आहेत. असा आरोप या रु ग्णालय प्रशासनावर होत आहे. तर उपचार सुरू असलेल्या या परिचारिकेला रोज १० हजार रु पये जमा करण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे या आजारातून कसे बरे व्हायचे असा सवाल तिच्यासमोर उभा राहिला आहे.

  • मुंबई महानगर पालिका अत्यावश्य सेवा देणाऱ्या  कर्मचाऱ्यासाठी मोफत राहण्याची व्यवस्था करत आहे. रु ग्णालयात त्यांच्यावर मोफत उपचार होत आहेत. ठाण्यात देखील अत्यावश्यक सेवा देणाऱ्याना या सुविधा मिळायला हव्यात. ठाणे महानगर पालिकेच्या परिचारिकेचा पैशांसाठी छळ करणाऱ्या  रु ग्णालयावर कारवाई व्हावी. अन्यथा युनियनचा एकही आरोग्य कर्मचारी कर्तव्यावर हजर होणार नाही.- रवी राव, अध्यक्ष, म्युनिसिपल लेबर युनियन
टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या