शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन रुग्णांची संख्या २०० पार

By admin | Updated: July 2, 2017 06:07 IST

जिल्ह्यात स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा २११ वर गेला आहे. त्यामधील अजूनही ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि मीरा-भार्इंदर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा २११ वर गेला आहे. त्यामधील अजूनही ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि मीरा-भार्इंदर येथे ९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, १०१ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. ठाणे महापालिका हद्दीत स्वाइन फ्लूपाठोपाठ डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांचीही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.जून महिन्यात स्वाइन फ्लूचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला असून लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २११ झाली आहे. त्यातच १ जुलै रोजी २९ रुग्ण वाढले असून त्यामध्ये ठाण्यात ११ आणि कल्याण आणि मीरा-भार्इंदर तसेच नवी मुंबईतील आहेत. तर, दगावलेल्या एकूण १३ रुग्णांमध्ये ९ रुग्ण हे ठाण्यात दगावल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरात डेंग्यू-मलेरिया वाढलास्वाइन फ्लूपाठोपाठ ठाणे महापालिका हद्दीत डेंग्यूचे तब्बल १०७ तर मलेरियाचे ३६८ रु ग्ण आढळल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली. याचदरम्यान आतापर्यंत मलेरियाच्या ४० हजार रक्ततपासण्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे लेप्टोचा एक रुग्ण आढळून आला असून त्याचाही मृत्यू झाला आहे. तसेच कावीळचे सात, टायफॉइडचे सहा रुग्ण आढळले आहेत. या वाढत्या साथीच्या आजाराने आरोग्य विभागाने आता १७८ प्रस्ताविकांची नेमणूक केली असून ते घरोघरी जाऊन याबाबत तपासण्या करीत आहेत. एक आठवड्यापेक्षा अधिक काळ पाणी साठवून ठेवू नये, आपले घर आणि आपल्या परिसरात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. त्याचप्रमाणे जनजागृतीही सुरू करण्यात आली आहे.