शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पटसंख्या वाढली विद्यार्थी बसणार कुठे?

By admin | Updated: September 5, 2015 22:22 IST

एकीकडे सोयीसुविधांच्या अभावात विद्यार्थ्यांच्या पटसंख्येला घरघर लागली असताना व दुसरीकडे शाळेचा पट वाढत असतानाही जागेअभावी विद्यार्थी बसवायचे तरी कुठे, अशी समस्या उभी राहिली आहे.

- प्रशांत माने,  कल्याणएकीकडे सोयीसुविधांच्या अभावात विद्यार्थ्यांच्या पटसंख्येला घरघर लागली असताना व दुसरीकडे शाळेचा पट वाढत असतानाही जागेअभावी विद्यार्थी बसवायचे तरी कुठे, अशी समस्या उभी राहिली आहे. टिटवाळ्या नजीकच्या उंभार्णी परिसरातील सोनुभाऊ बसवंत प्राथमिक विद्यालयात. ही मराठी माध्यमाची शाळा आहे. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग या ठिकाणी आहेत. या शाळेत बालवाडी नाही. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत ती भरते. सध्या तिची पटसंख्या ६८ इतकी असून मागील वर्षी ती ४७ होती. या शाळेला एकच खोली असून सर्व इयत्तांचे वर्ग एकत्रित भरविले जात आहेत. इयत्तांचा आढावा घेता पहिलीत १८, दुसरीत १३, तिसरीमध्ये ८, चौथीत ११ आणि पाचवीत १८ असे विद्यार्थी आहेत. जागेअभावी विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय होत असून बसायला बेंचेस अपुरे पडत आहेत. त्यामुळे काहींना जमिनीवर बसावे लागत आहे. या ठिकाणी शिकणारी ८० टकके मुले ही आदिवासी समाजातील आहेत. वह्या, पाठ्यपुस्तके, रेनकोट, कंपासपेटी, दप्तरे आदी शैक्षणिक सामुग्री त्यांना मिळाली आहे. परंतु, अद्याप गणवेश मिळालेला नाही. शाळेत एक संगणक आहे, तो ही स्थानिक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षी शाळेचे नूतनीकरण त्यांच्याच निधीतून झाले आहे. शालेय पोषण आहार नियमितपणे मिळत आहे. प्रसाधनगृहाची सुविधादेखील असून वर्गात वीज, पंखा तसेच फळा आदी सुविधा उपलब्ध आहेत. या ठिकाणी दोनच शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही.