शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याची संख्या वाढतेय जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 19:55 IST

एकीकडे ठाणे जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असतांना दुसरीकडे ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत २८ रुग्णांना कोरोनावर मात केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी ही समाधानकारकच बाब म्हणावी लागणार आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रु ग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात करीत रुग्ण बरे होण्याची संख्याही आता वाढू लागली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासाठी ही नक्कीच आनंदाची बातमी मानली जात आहे. ठाण्यात आतापर्यंत तब्बल १२ कोरोना बाधीत रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. तर तिकडे कल्याण डोंबिवलीतही १६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ठाणे जिल्ह्यात मागील २४ तासात १७ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ठाण्यात बुधवारी नवीन १४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर जिल्ह्यात आता एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही २६६ एवढी झाली आहे.                  ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहे. आता त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसू लागले आहे. परंतु आता ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. ठाणे जिल्ह्यात बुधवारी एका दिवसात १७ नवीन कोरोनाबाधित रु ग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रु ग्णांची आकडेवारी ही २५१ वरुन आता २६६ वर पोहोचली असून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महानगर पालिका क्षेत्रात बुधवारी नवीन १४ रुग्ण आढळले असून कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या ९५ वर पोहोचली आहे.मागील काही दिवसात ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. परंतु आता ती काहीशी कमी झाल्याचे दिसत आहे. सोमवारी ३० रुग्णांची भर पडल्यानंतर मंगळवारी त्यात आणखी सात जणांची भर पडली तर बुधवारी यामध्ये १४ रुग्ण वाढल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परंतु ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे एकीकडे कोरोना बाधीतांची संख्या वाढत असतांना दुसरीकडे कोरोनावर मात करुन १२ रुग्ण हे ठणठणीत बरे झाले आहेत. दुसरीकडे कल्याण डोंबिवलीतही कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही ५७ एवढी असून त्यातील २ रुग्ण मयत झाले आहेत. तर आतापर्यंत १६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते बरे झालेले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असतांनाही दुसरीकडे जिल्ह्यासाठी ही एक आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे.दरम्यान ठाणे शहरात आजच्या घडीला ९५ जणांना याची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. तर १२ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एका नव्या रु ग्णांची नोंद झाली आहे. तेथील रु ग्णाच्या आकडा ५२ वर पोहोचला, तर, डोंबिवलीत दोन रुग्ण आढळले आहेत. येथील आकडा ५७ झाला आहे. तर अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी मिराभार्इंदर, ठाणे ग्रामीण या भागात एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या