शेणवा : सकस आहारा अभावी कुपोषित बाळकासह कुपोषित माताही आढळून येत असल्याने कुपोषित मातावर उपचार करण्याकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यासाठी उप जिल्हा रु ग्णालयात वेगळा कक्ष सुरु करण्यात आला असल्याचे सांगून ठाणे जिल्ह्यात 60 तर पालघर जिल्ह्यात तीव्र कुपोषित बालकांची संख्या 109 असून पालघरपेक्षा ठाणे जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. सोनावणे यांनी शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित आरोग्य जागर कार्यक्र मात बोलताना सांगितले.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ महेश नगरे,वैद्यकीय अधिकारी प्रशांत कनोजा,गणपत रण,गिरीश लटके उपस्थित होते. (वार्ताहर)
कुपोषितांचे प्रमाण ठाणे जिल्हयात घटले
By admin | Updated: March 30, 2017 05:20 IST