शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

नुबैरशाह शेख ‘इंटरनॅशनल मास्टर’

By admin | Updated: September 7, 2016 02:39 IST

ठाण्याच्या १८ वर्षीय नुबैरशाह शेखने २३ व्या अबुधाबी आंतरराष्ट्रीय ग्रॅण्ड मास्टर ओपन बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करून तिसरा आणि अंतिम ‘इंटरनॅशनल मास्टर’ नॉर्म मिळवला

ठाणे : ठाण्याच्या १८ वर्षीय नुबैरशाह शेखने २३ व्या अबुधाबी आंतरराष्ट्रीय ग्रॅण्ड मास्टर ओपन बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करून तिसरा आणि अंतिम ‘इंटरनॅशनल मास्टर’ नॉर्म मिळवला. यापूर्वी २४०० आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकन पार केलेले असल्यामुळे जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून त्याला ‘इंटरनॅशनल मास्टर’ किताब देऊन गौरवण्यात आले.जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या परवानगीने संयुक्त अरब अमिरात बुद्धिबळ महासंघाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ३२ देशांतील ४६ ग्रॅण्ड मास्टर्स, ४१ इंटरनॅशनल मास्टर्स व १४ फिडे मास्टर्ससह एकूण १३७ स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्वीस लीग पद्धतीने ही स्पर्धा नऊ फेऱ्यांमध्ये खेळवण्यात आली. नुबैरशाहला (२४१५) आंतरराष्ट्रीय गुणांकनाप्रमाणे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ६२ वे मानांकन देण्यात आले होते. त्याने या स्पर्धेत चीनचा वांग झिनमू (२०९२), आपल्याच देशातील अनिरुद्ध देशपांडे (२२१५), रशियाचा इंटरनॅशनल मास्टर गोलुबोव सेवली (२४८१) व अर्मेनियाचा आघाडीचा ग्रॅण्ड मास्टर मेल्कुम्यान हरन्त (२६५०) यांना पराभवाचे धक्के दिले, तर युक्रेनचा ग्रॅण्ड मास्टर बोर्तनिक अलेक्झांडर (२५८८) व अर्मेनियाचा ग्रॅण्ड मास्टर तेरसहाकिन सॅमवेल (२६१३) यांना बरोबरीत रोखले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत नुबैरशाहला रशियाचा ग्रॅण्ड मास्टर सॅवचेन्को बोरिस (२६०३), युक्रेनचा ग्रॅण्ड मास्टर ओलेकसियन्को मिखायलो (२६१०) आणि भारताचा ग्रॅण्ड मास्टर वैभव सुरी (२५५६) याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्याने या स्पर्धेतून नऊ सामन्यांतून चार विजय व दोन बरोबरी यांचे पाच गुण मिळवून २४९१ गुणांकनाची कामगिरी करून तिसरा ‘इंटरनॅशनल मास्टर’ नॉर्म मिळवला. आंध्र प्रदेशमध्ये आॅक्टोबर २०१६ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेतून जागतिक व आशियाई ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड होण्यासाठी त्याने जोरदार तयारी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)