शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

एनआरसी वसाहतीत ना वीज ना पाणी!

By admin | Updated: April 22, 2016 01:56 IST

एनआरसी कंपनीच्या कामगार वसाहतीचे कोट्यवधी रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला आहे.

कल्याण : एनआरसी कंपनीच्या कामगार वसाहतीचे कोट्यवधी रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ही वसाहत पाच दिवसांपासून अंधारात आहे. विजेअभावी वसाहतीतील नागरिकांना घरात पाणीही मिळत नाही. परिणामी, महिलांना पाण्यासाठी भर उन्हात वणवण करावी लागते. संतप्त रहिवाशांनी गुरुवारी कल्याण-डोंबिवली मुख्यालयात धाव घेतली. एनआरसी कंपनीने ९ नोव्हेंबर २००९ ला आर्थिक डबघाईचे कारण पुढे करीत कंपनीला टाळे ठोकले. कापड उद्योगनिर्मितीत असलेल्या कंपनीचा आशिया खंडात नावलौकिक होता. कंपनीने कामगारांसाठी वसाहत उभारली होती. जवळपास १४०० सदनिका या वसाहतीत आहेत. कंपनी बंद पडल्यावरही त्यात तीन हजार कामगार व त्यांचे कुटुंबीय राहत आहेत. कंपनीने कामगारांची थकीत देणी अजूनही दिलेली नाहीत. तो वाद न्यायप्रविष्ट आहे. मालकाने कंपनीची जागा विकली असून तो व्यवहारही वादग्रस्त ठरला आहे. एनआरसी वसाहतीला महावितरणकडून वीजपुरवठा होत आहे. त्याचे बिल कंपनी भरत होती. परंतु, सध्या कंपनीने वीजबिलाची थकबाकी थकवली आहे. यापूर्वीही वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितरणने वीजपुरवठा खंडित केला होता. जवळपास नऊ कोटी रुपयांची थकबाकी कंपनी व्यवस्थापनाने भरली नाही. त्यामुळे महावितरणने एनआरसी वसाहतीचा वीजपुरवठा पाच दिवसांपूर्वी खंडित केला आहे. त्यामुळे वसाहतीमधील पाणीपुरवठाही बंद झाला आहे. पाणी आणि विजेविना आम्ही त्रस्त आहोत, असे फरिदा पठाण, सुनंदा लोंढे, प्राजक्ता कूळधरण, श्रीकांत कांबळे, सूर्यप्रताप सिंग आणि रोहित सोनावणे या रहिवाशांनी सांगितले.वसाहतीमधील रहिवाशांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेत गुरुवारी धाव घेतली. यावेळी महिलांच्या शिष्टमंडळाने पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांची भेट घेतली. वसाहतीला टँकरने पाणीपुरवठा करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. तेथे एका नळाची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले आहे. दुसरीकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, जोपर्यंत थकबाकी भरली जात नाही, तोपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही. (प्रतिनिधी)