शहरं
Join us  
Trending Stories
1
Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
2
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
3
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
4
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
5
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
6
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
7
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
8
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
9
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
10
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
11
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
12
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
13
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
14
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
15
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
16
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
17
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
18
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
19
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
20
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...

एनआरसी वसाहतीची वीज-पाणी तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 00:07 IST

 एनआरसी कंपनीच्या आवारातील कामगार वसाहतीत ८०० कामगारांची घरे आहेत. त्यापैकी काही ठिकाणी कामगार राहतात. जी घरे  रिकामी आहेत ती पाडण्याचे काम सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : एनआरसी कंपनी अदानी समूहाने लिलावात घेतल्याने कामगार वसाहतीमधील घरे पाडण्याचे काम सुरू झाले आहे. वसाहतीमधील वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा रविवारी सायंकाळपासून खंडित झाला आहे. यापूर्वी रहिवाशांचे पाणी तोडले आहे. वसाहतीमधील नागरिकांनी घरे रिकामी करावीत याकरिता हे पाऊल उचलल्याचा आरोप रहिवाशांनी केला. एनआरसी कंपनीच्या आवारातील कामगार वसाहतीत ८०० कामगारांची घरे आहेत. त्यापैकी काही ठिकाणी कामगार राहतात. जी घरे  रिकामी आहेत ती पाडण्याचे काम सुरू आहे. या पाडकामाला कामगारांचा विरोध आहे. कामगारांची थकीत देणी दिलेली नसताना पाडकाम कसे काय केले जात आहे. दोन महिन्यांपासून कामगार वारंवार पाडकामाला विरोध करीत आहेत. आता वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा करणारी वाहिनी जेसीबीमुळे तुटली किंवा जळाली असे सांगण्यात येत आहे. अदानीने कंपनीची जागा घेतली आहे. त्यांच्याकडून ताबा घेणे सुरू आहे. मात्र या ताबापत्रात घरे तोडण्यास परवानगी दिली आहे का, असा सवाल कामगारांनी केला आहे. यापूर्वी कामगार वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांचा पाणीपुरवठा आणि आता वीजपुरवठा खंडित झाला आहे. कामगार वसाहतीमधील नागरिकांना त्रास देऊन त्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप कामगार रामदास पाटील यांनी केला.

शुक्रवारी मुंबईत होणार बैठककेंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी ५ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता सह्याद्री अतिथी गृहावर एक बैठक बोलावली आहे. या बैठकीस संबंधितांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. एनआरसी कामगार संघर्ष समितीचे भीमराव डोळस यांनी एनआरसी प्रकरणात आठवले यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली होती.