शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर आता ड्रोन कॅमेऱ्यांचा वॉच

By admin | Updated: January 15, 2017 05:15 IST

वारंवार कारवाई करूनही स्टेशन परिसरातील फेरीवाले हटत नसल्याने आता हतबल झालेल्या ठाणे महापालिकेने या परिसरातील फेरीवाल्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची

ठाणे : वारंवार कारवाई करूनही स्टेशन परिसरातील फेरीवाले हटत नसल्याने आता हतबल झालेल्या ठाणे महापालिकेने या परिसरातील फेरीवाल्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची नजर ठेवण्याची योजना पुढे आणली आहे. परंतु,यापूर्वी सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक, तीन शिफ्टमध्ये उपायुक्तांच्या नेमणुका करूनही या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात पालिका अपयशी ठरली आहे. त्यात, या भागातील व्यापाऱ्यांनी या फेरीवाल्यांविरोधात पुन्हा एल्गार पुकारल्याने नाइलाजास्तव आयुक्तांना आता हा निर्णय घ्यावा लागल्याचे बोलले जात आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्टेशन परिसर ते जांभळीनाका या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण केले. त्यानंतर, हा परिसर ना-फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषितही केला. परंतु, रुंद झालेल्या रस्त्यांवर पुन्हा फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याने येथील व्यापारीवर्ग हैराण झाला. तसेच पालिकाही त्यांच्यावर वारंवार कारवाई करीत आहे. सुरुवातीला त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हींची संकल्पना मांडली होती. स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या एका संयुक्त पथकाची घोषणाही मध्यंतरी झाली होती. त्यानंतरही अतिक्र मणांचा विळखा कायम असल्याने आयुक्तांनी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना वार ठरवून या भागातल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोणताही अधिकारी नेमून दिलेल्या दिवशी या भागात फिरकत नसल्याचे स्पष्ट होत आहे. पालिकेची पथके या भागात कारवाईसाठी तैनात असली तरी ते कारवाईसाठी येणार असल्याची खबर व्हॉट्सअ‍ॅपवरून फेरीवाल्यांना दिली जाते आणि काही वेळासाठी तेया भागातून गायब होतात, अशी तक्रार व्यापाऱ्यांनीच आयुक्तांकडे केली होती.एकूणच वारंवार कारवाई करूनही फेरीवाले येथून हटत नसल्याने आता कारवाईदरम्यान फेरीवाले पळून जात असतील, तर त्यावर ड्रोन कॅमेऱ्याने पाळत ठेवून कडक कारवाई करा, असे आदेश आयुक्तांनी शनिवारी बैठकीत दिले. मात्र, सॅटीसच्या पुलाखाली जर फेरीवाले बसत असतील, तर तिथे ड्रोन कॅमेरे उडवणार कसे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याशिवाय, ड्रोन कॅमेरे वापरणाऱ्या तंत्रज्ञांना फेरीवाले आणि पालिकेचे भ्रष्ट कर्मचारी हाताशी धरणार नाहीत, याची शाश्वती काय? पालिकेची पथके कारवाईसाठी येतात, याची खबर जर त्यांना लागते, तर ड्रोन कॅमेऱ्यांची देखरेख त्यांना कळणार नाही का, असे सवाल उपस्थित होत आहेत. (प्रतिनिधी)