शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आता जव्हारच्या सुरक्षेला सीसीटीव्हीची साथ

By admin | Updated: June 25, 2017 03:52 IST

जव्हार शहरातील मुख्य १४ ठिकाणी आता सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून पोलीसांची नजर या परिसरावर राहणार आहे

हुसेन मेमन । लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : जव्हार शहरातील मुख्य १४ ठिकाणी आता सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून पोलीसांची नजर या परिसरावर राहणार आहे. यामुळे शहराच्या सुरक्षेतही वाढ होणार आहे. आदिवासी विकास प्रकल्पाच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत आदिवासी विकास विभागातर्फे पालघर जिल्हा आदिवासी उपायोजनेच्या निधीतून ही यंत्रणा बसविण्याचे काम पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी करून घेतले असून त्याचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी करण्यात आले. यावेळी जव्हार प्रकल्प अधिकारी पवनीत कौर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश घाडगे, सभापती ज्योती भोये, पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव, माजी नगराध्यक्ष दिनेश भट, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप तेंडूलकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते हरी भोये, अर्शद कोतवाल, आदि उपस्थित होते. नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तसेच तालुक्यातील गुन्हेगारी वृत्तीला आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहराच्या मुख्य ठिकाणी कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हे घडून आले. हे कॅमरे चांगल्या प्रतीचे असून टॉवर व रेडीओ यंत्रणेचा वापर करून ते वायफाय ने जोडले गेले आहेत. अत्याधुनिक तंत्रामुळे या कॅमेऱ्याद्वारे छोट्या छोट्या हालचाली सुध्दा चित्रीत होत आहेत. दिवसें दिवस वाढती गुन्हेगारीची समस्या गंभीर बनत चालली आहे. जव्हार हे थंड हवेचे ठिकाण असल्याने येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. वाढती गुन्हेगारी व पोलिसांचे मनुष्यबळ कमी यामुळे त्यांच्यावर ताण पडत होता. या सुविधेमुळे तो कमी होईल. पोलीस यंत्रणेला गैरप्रकार तसेच गुन्हेगारीला आळा घालणे तसेच बेजाबादारीने होणारे अपघात, रोड रोमीओंचा उच्छाद, वाहतुकीचे मोडले जाणारे नियम यालाही प्रतिबंध घालता येईल.