शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

आता खेळपट्टीतूनही मलिदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:34 IST

मीरा- भार्इंदर महापालिकेच्या मैदानातील क्रिकेट सराव खेळपट्टी प्रशिक्षणासाठी भाड्याने देण्यासाठीही गैरप्रकार

मीरा रोड : मीरा- भार्इंदर महापालिकेच्या मैदानातील क्रिकेट सराव खेळपट्टी प्रशिक्षणासाठी भाड्याने देण्यासाठीही गैरप्रकार चालवल्याचा प्रकार उघड झाला आहे. दोन मैदानातील खेळपट्टी भाड्याने देण्याची निविदा आॅफलाईन तर एका मैदानातील खेळपट्टी निविदा मात्र आॅनलाईन काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. स्थायी समितीनेही एका खेळपट्टीची निविदा ठोस कारण नसताना रद्द केली होती. यामुळे सत्ताधारी व प्रशासन यांचे साटंलोटं उघड झाल्याचा आरोप होत आहे. यात खेळाडूंचे मात्र नुकसान होत आहे.मैदानांमध्ये क्रिकेटच्या सरावासाठी नेट लाऊन खेळपट्टया तयार करण्यात आल्या आहेत. काही खेळपट्या या पालिकेने संस्थांना भाड्याने दिल्या आहेत. शहरातील होतकरू खेळाडूंना शहरातच चांगले प्रशिक्षण मिळायला हवे अशी आहे.पालिकेने नवघर येथील सचिन तेंडुलकर मैदान ४ तर सेव्हन स्वेक्अर शाळेमागील आरक्षण क्रमांक २४६ या मैदानातील ४ खेळपट्ट्या भाड्याने देण्यासाठी ११ मे २०१८ ला मिळकत विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी आॅफलाईन निविदा काढली. महापालिकेच्या संकेतस्थळावर ही निवीदा टाकण्यात आली नाही.एकीकडे दोन मैदानातील खेळपट्या भाड्याने देण्यासाठी आॅफलाईन निविदा मिळकत विभागाने काढलेली असताना पालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर ९ या कलावती आई मैदानातील एक खेळपट्टी भाड्याने देण्यासाठी २१ मे २०१८ ला आॅनलाईन निविदा प्रसिध्द केली.यात विशेष बाब म्हणजे मिळकत विभाग व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे एकच व्यक्ती म्हणजे दीपक खांबित आहेत. वास्तविक सर्व निविदा या आॅनलाईन काढण्यासह त्या महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केल्या गेल्या पाहिजेत. पण दोन मैदानातील खेळपट्टी भाड्याने देण्याची निविदा आॅफलाईन तर एका मैदानातील खेळपट्टीची निविदा आॅनलाईन काढल्याने यामागे गैरप्रकार असल्याचे स्पष्टच आहे. त्यातही मीरा रोडच्या सेव्हन स्क्वेअर शाळेमागील मैदानात आधीपासूनच चार खेळपट्या असून तेथे नेट लाऊन वापर सुरु आहे.बेकायदा वापरखेळपट्या पालिकेने केल्या नसून खाजगी व्यक्ती ते बांधून बेकायदा वापर करून पालिकेचा महसूल बुडवत असल्याच्या तक्रारी आहेत.परंतु सेक्टर ९ मधील मैदानातील खेळपट्टी तुटली असून त्याचे नेटही खराब झालेले असताना ते दुरूस्त न करताच पालिकेने पुन्हा आॅनलाईन निविदा मागवली. याआधी खेळपट्टी भाड्याने देण्यासाठी आॅनलाईन निविदा मागवण्यात आल्या होत्या.दीड वर्षापासून पालिकेचा निविदा मागवण्याचा प्रकार सुरू आहे. या खेळपट्टीसाठी निविदा आल्याही होत्या परंतु स्थायी समितीने त्याला मंजुरी दिली नाही.सेक्टर ९ च्या खेळपट्टीची निविदा रद्द करण्यामागे शहरातील अशा सर्वच खेळपट्या आदींचे प्रस्ताव एकत्र आणा असे बांधकाम विभागास सांगितले होते. यात साटंलोटं वगैरे बिनबुडाचे आरोप आहेत.- ध्रुवकिशोर पाटील,सभापती, स्थायी समिती.दोन विभागाने निविदा काढल्या असून मिळकत विभागातील कर्मचाऱ्यांकडून नजरचुकीने आॅफलाईन निविदा गेली आहे. ती आॅनलाईन काढली जाईल. सेक्टर ९ च्या खेळपट्टीला स्थायी समितीची मंजुरी न मिळाल्याने पुन्हा निविदा काढली आहे.- दीपक खांबित,कार्यकारी अभियंता.खेळातही सत्ताधारी भाजपा व प्रशासन घाणेरडे राजकारण करत आहेत. मर्जीतल्या लोकांना काम देण्यासाठी पालिकेचे आर्थिक नुकसान व खेळाडूंना सरावापासून वंचित ठेवण्याचा प्रकार आहे. कारवाई झाली पाहिजे अशी तक्रार आयुक्तांकडे केली आहे.- प्रमोद सामंत, माजी नगरसेवक.