शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आता भरणार ‘आगरी शाला’,  १० दिवसाच्या आगरी बोलीचे प्रशिक्षणवर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 16:51 IST

उन्हाळ्याच्या सुट्टीत आगरी शाला भरली जाणार आहे. १० दिवसाच्या आगरी बोलीचे प्रशिक्षणवर्ग घेण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देआता भरणार ‘आगरी शाला’१० दिवसाच्या आगरी बोलीचे प्रशिक्षणवर्गप्रशिक्षण वर्ग भिवंडीतील कशेळी गावात भरणार

ठाणे : १मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘आगरी शाला’ या १० दिवसाच्या आगरी बोलीचे प्रशिक्षणवर्ग घेण्याचे ठरविले आहे. ‘आगरी शाला’ याचे प्रशिक्षण वर्ग भिवंडीतील कशेळी गावात भरणार आहेत. या ‘आगरी शाला’ प्रयोगासाठी काही विषेश तज्ञ-मार्गदर्शकांचाही सहभाग असणार आहे.  

     मुंबई-ठाणे-रायगड-नाशिक मधील स्थानिकांची बोली म्हणजे आगरी बोली. प्रसार माध्यमात तसेच विविध मालिकांमध्ये सर्रास वापरली जाणारी बोली तिच्या गोडव्यामुळे आपल्याला ठाऊक आहे. परंतू अनेकांना या भाषेचे नेमके पैलु माहित नाहीत. तसेच ईंग्रजी-हिंदीच्या वाढत्या प्रभावामुळे हल्ली आगरी बोलीचा वापर हा कमी होत चाल्ला असून परिणामी ही बोली बोलणार्या वर्गाला ह्या भाषेचा विसर पडत चाल्ला आहेच. ह्यावर उपाय म्हणून ज्यांना आगरी बोली शिकायची आहे वा तिच्याबद्दल अधिक माहिती मिळवायची आहे त्यांच्यासाठी युवा साहित्यिक सर्वेश रविंद्र तरे यांनी १मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘आगरी शाला’ या १० दिवसाच्या आगरी बोलीचे प्रशिक्षणवर्ग घेण्याचे ठरविले आहे. सर्वेश तरे हे स्वत: बोलीभाषा अभ्यासक असून ९० व्या अ.भा साहित्य संमेलनातील बोलीभाषा समितीचे सदस्य होते. या ‘आगरी शाला’ प्रयोगासाठी काही विषेश तज्ञ-मार्गदर्शकांचाही सहभाग असणार आहे. त्यात आगरी शब्दकोशाचे निर्माते प्रा.सदानंद पाटील,आगरी बोली आणि संस्कृतीचे अभ्यासक मोरेश्वर पाटील,आगरी कवी-साहित्यिक गजानन पाटील,९० व्या अ.भा साहित्य संमेलनाच्या बोलीभाषा कट्ट्याचे अध्यक्ष डाॅ.अनिल रत्नाकर,प्रसिध्द कवी-साहित्यिक प्रकाश पाटील तसेच लोकगीतातील गीतकार संगीतकार दया नाईक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या ‘आगरी शाला’ प्रयोगा अंतर्गत सहभागी आगरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी लघु पाठ्यक्रम असलेल पुस्तकही मिळणार आहे. ज्यात आगरी बोलीतील पद्य आणि गद्य चा समावेश असेल,याचे संपादन मोरेश्वर पाटील आणि सर्वेश तरे यांनी स्वत: केले आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी जास्तीत जास्त आगरी भाषा प्रेमींनी मग ते कोणत्याही वयोगटातले असोत त्यांनी सहभाग घ्यावा असे सर्वेश तरे यांनी आवाहन केले असून इच्छूकांनी आपली माहिती sarvyatare@gmail.comवर पाठवावी वा ९०९६७२०९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा. या आगरी बोलीतील प्रयोगानंतर इतरही बोलीत असे प्रयोग करण्याचा विचार करीत असल्याचे डाॅ.अनिल रत्नाकर यांनी सांगीतले आहे.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई