शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रदूषण केमिकलच्या तवंगामुळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:03 IST

नाल्यावर पसरलेले तवंग काढले; प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले नमुने

डोंबिवली : खंबाळपाडा परिसरातील प्रदूषणाला रंगाने माखलेल्या गोण्या धुणारा भंगारवाला कारणीभूत असल्याचा जावईशोध लावणाऱ्या कामा संघटना आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आता या परिसरातील एका नाल्यावर तेल सदृश्य केमिकलचा तवंग पसरल्याचे आढळून आले आहे. हा तवंग काढण्याचे काम बुधवारी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत सुरू होते. कोणत्या तरी कंपनीतून हे केमिकल आले असावे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे तर कोणीतरी हे केमिकल नाल्यात टाकले असावे, असा निष्कर्ष प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढला आहे. आता हा केमिकलचा तवंग काढल्यानंतर तरी या भागातील वायूप्रदूषण थांबते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर तीन दिवस थांबलेला खंबाळपाडा भोईरवाडी परिसरातील वायुप्रदूषणाचा त्रास रविवार मध्यरात्रीपासून पुन्हा सुरू झाला. सोमवारी दिवसभर प्रदूषणाचा दर्प कायम राहिल्याने रहिवासी संतप्त झाले होते. प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्यानंतरही कोणतीही दखल न घेतली गेल्याने संतापलेले रहिवासी सायंकाळी रस्त्यावर उतरले होते. यात घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आलेल्या कामा संघटनेच्या माजी पदाधिकाºयाला घेराव घालून जाब विचारण्यात आला. या प्रदूषणाची दखल मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी शंकर वाघमारे यांना ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.बुधवारी पुन्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि कामा संघटनेच्या पदाधिकाºयांच्या वतीने सकाळपासून शोधमोहीम सुरू झाली. या मोहिमेत भोईरवाडीतील एका नाल्यात केमिकलचा तवंग पसरला असल्याचे आढळले. याचमुळे दर्प पसरल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. अखेर हा तवंग काढण्यास सुरुवात झाली. नाल्यातील दोन ते तीन भागांत हा तवंग होता. सायंकाळी पाचपर्यंत तवंग काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले. दरम्यान, या तवंगाचे नमुने तपासणीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी घेतले आहेत. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे हे स्वत: उपस्थित होते.नमुने घेतले आहेत आता पाहू!ज्याठिकाणचा तवंग काढण्यात आला आहे त्याभागातील दर्प कमी झाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी नमूने घेतले आहेत. कोणत्या कंपनीतून केमिकल आणले गेले अथवा सोडण्यात आले असावे त्याचा शोध ते घेणार आहेत. आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला होता; पण आता दोन-चार दिवस थांबून परिस्थितीमध्ये काही बदल होतो का ते पाहू, असे खंबाळपाडा येथील रहिवासी काळू कोमास्कर यांनी सांगितले.वास आल्यास तत्काळ कळवावेनाल्याच्या पाण्यावर तेलमिाश्रत केमिकलचा तवंग आढळून आला आहे. ते आम्ही काढून टाकले आहे. कोणीतरी नाल्यात ते केमिकल आणून टाकले असावे असे आम्हाला वाटते. पण पुन्हा वास आल्यास तत्काळ कळवावे. - शंकर वाघमारे, प्रादेशिक अधिकारी कल्याण,प्रदूषण नियंत्रण मंडळ