शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता शिवसेनेकडूनही एलईडी बल्बचे वाटप

By admin | Updated: July 27, 2015 23:15 IST

केंद्र आणि राज्य शासनाने सुरु केलेल्या उपक्रमाअंतर्गत महावितरणने भांडुप परिमंडळात एलईडी ब्लबचे वाटप सुरु केले आहे. परंतु त्यांनी ही मोहीम हाती घेण्याआधीच शहरात भाजपाने

ठाणे : केंद्र आणि राज्य शासनाने सुरु केलेल्या उपक्रमाअंतर्गत महावितरणने भांडुप परिमंडळात एलईडी ब्लबचे वाटप सुरु केले आहे. परंतु त्यांनी ही मोहीम हाती घेण्याआधीच शहरात भाजपाने याचे वाटप सुरु केले. त्यानंतर महावितरणने ही मोहीम रविवारपासून हाती घेतली आहे. परंतु आता राजकीय श्रेयासाठी आता शिवसेनाही पुढे आली असून त्यांनीसुध्दा शहरात एलईडी बल्बचे वाटप करण्याची मोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांना याचा एक प्रोग्रॅमच आखला असून शहरातील विविध भागात या संदर्भातील कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.जुलै महिन्याच्या सुरवातीला शहर भाजपाच्या वतीने एलईडी बल्बच्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यानंतर रविवारी महावितरणने याचे वाटप सुरु केले आहे, त्यानुसार शहरात पहिल्याच दिवशी सुमारे पाच हजार बल्बचे वाटप करण्यात आल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. परंतु आता या बल्ब वाटपाच्या निमित्ताने ठाण्यात राजकीय वादळ पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. भाजपाने यात पहिली उडी घेऊन शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम हाती घेऊन या मोहीमेचा महावितरणने शुभारंभ करण्याआधीच नारळ फोडला. त्यानंतर महावितरण आणि आता शिवसेनेनेही या मोहीमेत उडी घेतली आहे. खासदार राजन विचारे यांनी आपल्या लोकसभा मतदार संघातील प्रत्येक नागरिकाला या योजनेचा लाभ व्हावा यासाठी प्रत्येक प्रभागात दोन ते तीन कार्यक्र म राबविण्याचा आग्रह करून या कार्यक्रमाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्र माला महापौर संजय मोरे, उपमहापौर राजेंद्र साप्ते, लोकसभा जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते. एकाच दिवशी शहरातील आठ ठिकाणी ही मोहीम हाती घेऊन त्यांनी याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.ठाण्यात वाटले ५ हजार आता नवीमुंबईलाही वेधमहावितरणकडून भांडूप परिमंडळातील भांडुप, मुलुंड मंडळाअंतर्गत १ जुलै पासून आतापर्यंत ७६००० तर ठाणे मंडळात पाच हजार बल्बचे वाटप करण्यात आले आहे. तसेच नवीमुंबईत या योजनेसाठी रजिस्ट्रेशन सुरु करण्यात आले असून पुढील आठवड्यापर्यंत या भागात ही योजना सुरु करण्यात येणार आहे.