शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

आता आगरी समाजालाच साकडे

By admin | Updated: January 14, 2017 06:29 IST

आपल्या मायमराठीचा जागर म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होय. मराठी भाषेबद्दल प्रेम-आत्मीयता असणारे,

डोंबिवली : आपल्या मायमराठीचा जागर म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होय. मराठी भाषेबद्दल प्रेम-आत्मीयता असणारे, साहित्यप्रेमी या संमेलनात सहभाही होणार आहेत. संमेलन मराठीजनांच्या मनात ठसावे, यासाठी आगरी युथ फोरमने आता आगरी समाजालाच साकडे घातले आहे.आगरी युथ फोरमने त्यासाठी १४ जानेवारीला दुपारी ४ वाजता होरायझन सभागृह, मानपाडा रोड येथे बैठक बोलवली आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी फोरम २५ वर्षे कार्यरत आहे. ही संस्था १४ वर्षांपासून आगरी महोत्सव भरवत आहे. आपल्या समाजाभिमुख विचाराचा आधार घेऊनच आगरी महोत्सवाचे आयोजन केले जात असल्याने महोत्सव अधिक लोकाभिमुख झाला आहे. यामुळेच संस्थेला यंदाच्या वर्षी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. आगरी समाजाला साहित्य प्रांत नवा नाही. समाजातील मंडळींनी पारंपरिक गाणी, गोष्टींद्वारे या साहित्याची मौखिक जपणूक केली आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपल्या मातृभाषेच्या साहित्य संस्कृतीच्या ऋणातून कणभर का होईना, उतराई होण्याची संधी संस्थेला मिळालेली आहे. हे केवळ संमेलन नव्हे, तर मायमराठीचा वैभवशाली महोत्सव आहे. समाजामध्ये वाचनसंस्कृतीला चालना मिळावी आणि लेखनिकता वाढावी, या हेतूने संमेलन भरवले जाते. आगरी समाजाच्या सहकार्याशिवाय हा शिवधनुष्य पेलता येणार नाही. त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे, असे एक पत्रक काढण्यात आले आहे. (प्रतिनिधी)