शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात आता १४ मोबाइल टॉयलेट

By admin | Updated: April 24, 2017 02:24 IST

स्मार्ट सिटीत निवड झालेल्या ठाणे शहराची लोकसंख्या ही २२ लाखांच्या घरात गेली आहे. ती लक्षात घेता, नागरिकांना शौचालयांची आवश्यकता पडणार आहे.

ठाणे : स्मार्ट सिटीत निवड झालेल्या ठाणे शहराची लोकसंख्या ही २२ लाखांच्या घरात गेली आहे. ती लक्षात घेता, नागरिकांना शौचालयांची आवश्यकता पडणार आहे. त्यानुसार, महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत हगणदारीमुक्त ठाणे ही संकल्पना राबवण्यासाठी शहरात विविध १४ ठिकाणी मोबाइल टॉयलेटच्या सुविधा देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.ठाणे शहरांतर्गत ज्याज्या वेळी एखाद्या सार्वजनिक कार्यक्र माचे आयोजन केले जाते, तेव्हा त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना शौचालयांची कमतरता नेहमीच भासते. परिणामी, अशा वेळेस मोठ्या प्रमाणात अस्वच्छता शहरात पसरून त्यातून रोगराई होण्याचा धोकाही संभवतो. यावर उपाय म्हणून शहरात १४ मोबाइल टॉयलेट वाहने विकत घेण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्याकरिता, यंदाच्या अर्थसंकल्पात २५ लाख रु पयांच्या निधीची तरतूद केली आहे. या मोबाइल टॉयलेटअंतर्गत एका मोठ्या ट्रकवर हे शौचालय उभे असणार असून तिथेच पाण्याची व्यवस्था आणि अन्य सुविधा असणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे याकरिता ठाणे महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. दरम्यान, ठामपाच्या हद्दीत शौचालयांच्या कमतरतेचा मुद्दा नेहमीच गाजतो आहे. आजघडीला किसननगर, लोकमान्यनगर, इंदिरानगर, कळवा, मुंब्रा, वर्तकनगर, वागळे इस्टेट, या पट्ट्यांत शौचालयाअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होते. ठामपाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात काही शौचालये बांधली आहेत. परंतु, अनेक ठिकाणी त्यांची दुरवस्था आहे. याबाबत नेहमीच ओरड होते. (प्रतिनिधी)