शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

टँकरचालकांना बजावल्या नोटिसा; पाणीचोरीमुळे कामवरी नदी कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:19 IST

लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने कामवरी नदीवर लाखो रुपये खर्च करून काँक्रिटचे बंधारे बांधले आहेत.

रोहिदास पाटील अनगाव : ‘भिवंडी तालुक्यातील कामवरी नदी कोरडी’ असे वृत्त मंगळवारच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल भिवंडी पंचायत समितीच्या सभापती रवीना जाधव यांनी घेतली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत पाणीटंचाईसह दुरवस्था झालेल्या बंधाºयाची पाहणी करण्याचे आदेश दिले. तसेच तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. नदी कोरडी पडलेली असताना पाणीचोरी सुरूच आहे. याबाबत ग्रामपंचायतीने टँकरमालकांना नोटिसा बजावल्या असल्याचेही जाधव यांनी सांगितले. डाइंग कंपनीला टँकरमधून पाणीपुरवठा होतो.

भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे चित्र ‘लोकमत’ने मांडल्यानंतर त्याची दखल आमदार शांताराम मोरे यांनी घेतली. त्यांनी ग्रामसेवक व श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. मोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतरही पाणीटंचाई दूर झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने कामवरी नदीवर लाखो रुपये खर्च करून काँक्रिटचे बंधारे बांधले आहेत. जेव्हा बंधाºयाचे काम सुरू होते, तेव्हा अधिकाºयांनी उपस्थित असणे आवश्यक असते. मात्र, येथील अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याने कामच निकृष्ट दर्जाचे झाल्याने बंधाºयाची दुरवस्था झाली. बंधारे वाहून गेल्याने पाणी साठून राहत नाही, याकडे लघुपाटबंधारे विभागातील अधिकारी लक्ष देतील का, असा प्रश्न येथील शेतकºयांनी उपस्थित केला आहे. त्याकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाºयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी संबंधित अधिकाºयांना अहवाल सादर करण्याची सूचना दिली असून नदीपात्राचे खोदकाम करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. शेलार ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व्ही.एस. जाधव यांनी सरपंच, उपसरपंच व सदस्यांची सभा घेऊन पाणीचोरांना नोटिसा बजावल्या.

गाळ काढल्यास उन्हाळ्यात फायदा होईलकामवरी नदीतील गाळ काढल्यास पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाºया नदीच्या पाण्याचा उन्हाळ्यात शेतकºयांना भाजीपाला, जनावरांना, नागरिकांना उपयोग होईल. याकरिता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीवनलाल सोनवणे लक्ष देतील का, असा प्रश्न येथील शेतकºयांनी उपस्थित केला आहे.

अजूनही टंचाई भेडसावत आहेजून महिना उजाडला, तरी नागरिकांना खड्ड्यांतील दूषित पाणी व हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. अधिकारी सांगतात, पाणीटंचाई दूर झाली, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा मंजूषा जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी भिवंडी तालुक्यातील पाणीटंचाईची खरी वस्तुस्थिती पाहण्यासाठी दौरा करतील का? अधिकाºयांनी कागदोपत्री दाखवलेल्या पाणीटंचाई दूर झाल्यावर विश्वास ठेवणार, असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला आहे.