शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ४०५ हॉटेल, बार, मंगल कार्यालये, मॉल्सना बजावल्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:53 IST

ठाणे : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ठाणे पोलिसांच्या वतीने शहरातील ४०५ हॉटेल, बार, ढाबे, पब, मॉल्स ...

ठाणे : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ठाणे पोलिसांच्या वतीने शहरातील ४०५ हॉटेल, बार, ढाबे, पब, मॉल्स आदींना नोटिसा बजावल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी दिली. या नोटिसीद्वारे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाबाबत जे नियम घालून देण्यात आले आहेत, त्याचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

रुग्णांची वाढती संख्या नजरेसमोर ठेवून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्रात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हेदेखील उपस्थित होते. यावेळी पालिका आणि पोलिसांच्या मदतीने कोरोना रोखण्यासाठी महत्वाची पावले उचलण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहरात गर्दीच्या १०५ ठिकाणांवर भोंग्याद्वारे सूचना दिल्या जात असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, स्क्रिनिंग करणे, तसेच सॅनिटायझरचा वापर करण्याबरोबर मास्कचा वापर करण्याचे आवाहन या माध्यमातून केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय मास्कचा वापर न करणाऱ्यांविरोधात दंडाची मोहीम हाती घेण्यात आली असून तशा सूचना वाहतूक पोलिसांना केल्या आहेत. याशिवाय सध्या हॉटेल, बार, रेस्टॉरंट, मॉल, मोठी दुकाने, मंगल कार्यालये, पब, ढाबे आदी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या ४०५ आस्थापनांना नोटिसा बजावल्याचेही त्यांनी सांगितले. या नोटिसीद्वारे प्रत्येक आस्थापनाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, स्क्रिनिंग करण्यात यावे आदी महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन न केल्यास संबंधित आस्थापनांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आयुक्त शर्मा यांनीदेखील मंगल कार्यालये किंवा मॉल्स, हॉटेल, बार आदी ठिकाणी गर्दी होत असल्याचे सांगितले आहे. परंतु पोलिसांनी बजावलेल्या नोटिसीनुसार आस्थापनांनी नियमांचे पालन केले नाही, तर त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याबरोबर त्या आस्थापना सील करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वेळप्रसंगी त्यांचेदेखील परवाने रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला.