शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एक लाख १६ हजार चालकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:44 IST

ठाणे : वाहतुकीचे नियम पायदळी तुडविल्यानंतर वाहन चालक ठाणे शहर वाहतूक शाखेने आकारलेल्या दंडाची रक्कम वर्षानुवर्षे भरणे टाळतात. ...

ठाणे : वाहतुकीचे नियम पायदळी तुडविल्यानंतर वाहन चालक ठाणे शहर वाहतूक शाखेने आकारलेल्या दंडाची रक्कम वर्षानुवर्षे भरणे टाळतात. अशाच एक लाख १६ हजार चालकांना ठाणे शहर वाहतूक शाखेने नोटीस बजावली आहे. त्यातील तडजोड शुल्क २३ सप्टेंबरपर्यंत भरा, अन्यथा २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत हजर राहावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

या नोटीसकडे कानाडोळा करणारे पुन्हा वाहतूक पोलिसांच्या कारवाईत आढळल्यास वाहन जप्त करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. त्यामुळे दंडाबरोबर पुढील कारवाईलाही सामोरे जावे लागणार आहे. नवी दिल्ली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे ठाणे जिह्यातील सर्व न्यायालयांत २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हा व तालुका न्यायालयीन क्षेत्रातील न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून कारवाई केलेल्या नागरिकांकडून वर्षानुवर्षे दंड भरलेला नाही, अशा वाहन चालकांना नोटीस बजावली आहे. त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत जवळच्या वाहतूक उपविभागात तडजोड रक्कम भरण्याबाबत सूचना केल्या आहेत. ज्या नागरिकांना तडजोड शुल्क मान्य नसेल, त्यांनी २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत ठाणे न्यायालयात हजर राहावे, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक विभागामार्फत करण्यात आले आहे.

..........

वाहतूक नियमांचे उल्लंघन करून दंड भरण्यास टाळाटाळ करतील आणि पुन्हा वाहतूक पोलिसांच्या कारवाईदरम्यान आढळून येतील, अशांवर दंडात्मक कारवाईसह कायदेशीर कारवाईही होईल.

- श्रीकृष्ण कोकाटे, उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे शहर