शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे स्थानकात रिंग हायड्रंट्स बसविण्याच्या महापालिकेच्या रेल्वे विभागाला सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 15:32 IST

प्लेटफॉर्म रेल्वे डब्याला आग लागल्यास ती तत्काळ विझविण्यासाठी ठाणे महापालिकेने रेल्वेला मागील जून महिन्यातच या ठिकाणी रिंग हायड्रंट्स (गोलाकार नळ) बसविण्याच्या सुचना केल्या आहेत. परंतु ही बाब अद्यापही रेल्वेने मनावर घेतली नसल्याचेच मंगळवारच्या घटनेवरुन दिसून आले आहे.

ठळक मुद्देयापूर्वी देखील घडली होती अशीच घटनामहापालिका पुन्हा करणार पत्रव्यवहार

ठाणे - ठाणे रेल्वे स्थानकात कारशेडला उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याने मंगळवारी मध्यरात्री अचानक पेट घेतला आणि तो डबा जळून खाक झाला. मात्र अशा घटना घडू नयेत, किंवा घडल्यास, अग्निशमन पथक येईपर्यंत आग विझवण्यासाठी साधन उपलब्ध व्हावीत, यासाठी ठाणे महापालिकेने मध्य रेल्वेला रिंग हायड्रंट्स (गोलाकार नळ) बसवण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. ठाणे स्थानकात अशा प्रकारे घडलेली ही दुसरी घटना आहे. त्यामुळे अग्निशमन दल घटनास्थळी येईपर्यंत या नळांचा वापर करून आग विझवता येऊ शकेल असा दावा महापालिकेने केला आहे.                     ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र मांक १ जवळ सायिडंगला उभ्या असलेल्या लोकलच्या एका डब्याने मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास आग लागली होती. हा प्लॅटफॉर्म रस्त्याच्या अगदी जवळ आहे. बी-केबिन या बाजूने सुद्धा या प्लॅटफॉर्मवर जाता येते. मात्र ऐन गर्दीच्या वेळी असा प्रकार घडल्यास आणि स्थानकातील अन्य प्लॅटफॉर्म वर अशी घटना घडल्यास मोठी आपत्ती उदभवू शकते. त्यामुळे गेल्या जुने मध्ये स्थानकात ज्यावेळी अशी घटना घडली होती, त्याचवेळी आम्ही त्यांना अशा प्रकारे व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र रेल्वेने त्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती महापालिकेतील एका वरीष्ठ अधिकाºयाने दिली. अग्निशमन विभाग रेल्वे विभागाला पुन्हा या संदर्भात नव्याने सूचना पत्र देणार असल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले. स्थानकातील हे नळ, शासनाच्या नियमानुसारच असणार आहेत आणि अनेक स्थानकांमध्ये असे नळ आढळतात. अन्य वेळी, पाणी भरण्यासाठी, किंवा लांब पल्ल्याच्या गाडयांना धुण्यासाठी याचा वापर केला जातो. अशी माहिती सुद्धा महापालिकेतील अधिकाºयांनी दिली.प्रत्येक प्लॅटफॉर्म वर ३० मीटरच्या अंतरावर अशा प्रकारे हायड्रंट्स असायला हवेत. १०० मीटर लांबीचे आग विझवण्याचे पाईप्स असायला हवे, जेणेकरून, रेल्वे विभागाला अशा आपत्तीच्या वेळी या पाण्याचा वापर तत्काळ करता येईल. स्टेशनपर्यंत अग्निशमन दलाचे पाईप्स पोहोचणे तसे कठीण जाऊ शकतात. यामुळे अशी व्यवस्था रेल्वेने केल्यास अनर्थ टाळू शकेल असा दावाही पालिकेच्या एका वरीष्ठ अधिकाºयाने केला आहे.दरम्यान यापूर्वी ७ जुन २०१७ रोजी ठाण्यातील बी केबिन जवळील प्लॅटफॉर्म वरील उभ्या असलेल्या रेल्वे डब्याने पेट घेतला होता. रेल्वे विभागाला धूर घालवण्यासाठी शेवटी अग्निशमन दलाला बोलवावे लागले होते. तर नोव्हेंबर २०१६ मध्ये कल्याण लोकल मधील एका डब्ब्यात पेट घेतला होते. वरील पेंटाग्राफ तुटल्यामुळे, या डब्याने पेट घेतला होता. तब्बल ५० प्रवाशांना येथून सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. डब्याला लागलेल्या आगीच दृश्य बघून स्थानकात सुद्धा अनेकांनी पळापळ करायला सुरु वात केली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाRailway Passengerरेल्वे प्रवासी