शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरच्या ५ नगरसेवकांना नोटिसा

By admin | Updated: November 19, 2015 00:40 IST

अनधिकृत बांधकामांशी संबंधित नगरसेवकांच्या संदर्भातील तक्रारींची सुनावणी करण्यास आयुक्त अच्युत हांगे यांनी बुधवारी मान्यता दिली. त्यामुळे अशा तक्रारी असलेल्या

- धीरज परब,  मीरा रोडअनधिकृत बांधकामांशी संबंधित नगरसेवकांच्या संदर्भातील तक्रारींची सुनावणी करण्यास आयुक्त अच्युत हांगे यांनी बुधवारी मान्यता दिली. त्यामुळे अशा तक्रारी असलेल्या पाच नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. आयुक्त हांगे यांनी पाच तक्रारदारांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत सचिव हरेश पाटील यांना या नगरसेवकांना नोटिसा बजावण्याची सूचना केली. त्यानुसार, येत्या २४ नोव्हेंबर रोजी आयुक्त दालनात सुनावणीसाठी बोलवले आहे. नगरसेवकांवरील अपात्रतेची कारवाई लालफितीत... या मथळ्याखाली ५ नोव्हेंबरच्या लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. मीरा-भार्इंदर महापालिकेत अनधिकृत बांधकाम प्रकरणातील नगरसेवकांची सात प्रकरणे प्रलंबित आहेत. यामध्ये विद्यमान भाजपा आमदार तथा जिल्हाध्यक्ष व नगरसेवक असलेले नरेंद्र मेहता, काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक स्टीव्हन मेंडोन्सा, सध्या भाजपाशी जवळीक साधलेले काँग्रेसचे हंसुकुमार पांडे, सध्या भाजपात असलेल्या माजी नगरसेविका नयना म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे लियाकत शेख व त्यांची नगरसेविका पत्नी शबनम शेख यांचा समावेश आहे. नयना म्हात्रे यांनी मुर्धा येथील सरकारी जागेत तर स्टीव्हन मेंडोन्सा यांनी उत्तन-चवळी येथील सरकारी जागेत अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केल्याने त्यांना अपात्र ठरवण्याची तक्रार अनुक्रमे अरविंद गुप्ता व मिलन म्हात्रे यांनी केली होती. म्हात्रे व मेंडोन्सा यांना अपात्र ठरवण्यासाठी प्रकरण न्यायालयाकडे पाठवण्याचा प्रस्ताव तत्कालीन आयुक्त शिवमूर्ती नाईक यांनी महासभेपुढे ठेवला असता महासभेने तो फेटाळला होता. त्यानंतर, पालिका प्रशासनाने या प्रकरणी आजतागायत काहीच कार्यवाही केली नाही.नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित सेव्हन स्क्वेअर शाळेच्या ८ व्या मजल्याचे वाढीव बांधकाम अनधिकृत असल्याचे पालिकेने घोषित केल्याने त्यांचे पद रद्द करावे, अशी तक्रार साजी आय.पी. यांनी केली होती. हंसुकुमार पांडे यांनी आपल्या जेसल पार्क येथील राहत्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार राजू विश्वकर्मा यांनी केली असून पालिकेनेदेखील वाढीव अनधिकृत बांधकाम असल्याने दिलेला भोगवटा दाखला रद्द केला आहे. लियाकत शेख व शबनम शेख यांनी उत्तन येथे अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोघांचे पद रद्द करण्याची मागणी सय्यद मोईनुद्दीन यांनी केली आहे. नयानगर येथील बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकास विरोध करून ते तोडण्यास अडथळा आणल्यानेजुबेर इनामदार यांचे पद रद्द करण्याची तक्रार सय्यद गुलामनबी यांनी केली आहे.