शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
3
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
4
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
5
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
6
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
7
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
8
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
9
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
10
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
11
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
12
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
13
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
14
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
15
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
16
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
17
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
18
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
19
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
20
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?

पेट्रोल पंप घोटाळ्यातील आरोपींना नोटिसा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 05:25 IST

 राज्यव्यापी पेट्रोल पंप घोटाळ्यातील आरोपींना ठाणे पोलिसांनी नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास रोखणाऱ्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून, या संदर्भात आरोपींना त्यांची बाजू मांडण्यास पोलिसांनी सांगितले.

ठाणे  - राज्यव्यापी पेट्रोल पंप घोटाळ्यातील आरोपींना ठाणे पोलिसांनी नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास रोखणाऱ्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून, या संदर्भात आरोपींना त्यांची बाजू मांडण्यास पोलिसांनी सांगितले.पेट्रोल पंपांवर वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल टाकणाºया डिस्पेन्सिंग युनिटमध्ये पल्सर नामक यंत्र असते. या यंत्रामध्ये हेराफेरी करून, ग्राहकांना कमी इंधन देणाºया पेट्रोल पंपांवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली. ५७ आरोपींचा शोध सुरू आहे.या घोटाळ्यातील आरोपी पंप मालकांचे जामीन अर्ज उच्च न्यायालयाने डिसेंबर २0१७ मध्ये मंजूर केले. सहा पेट्रोल पंपमालकांनी हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे याचिका दाखल केली होती. पेट्रोल पंप घोटाळ्याचा तपास पूर्णत: तांत्रिक स्वरूपाचा असल्याने तो सक्षम यंत्रणेमार्फत करण्यात यावा, असा युक्तिवाद त्यांच्या वतीने करण्यात आला. न्यायालयाने तो ग्राह्य धरून पोलिसांना या प्रकरणाचा तपास थांबवण्याचे आदेश दिले.ठाणे पोलिसांनी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. पेट्रोल पंपांवरील कारवाईदरम्यान वजन व मापे निरीक्षक कार्यालयासह संबंधित आॅइल कंपन्यांच्या अधिकाºयांनाही पोलिसांनी सोबत घेतले होते. संपूर्ण कारवाई नियमाला धरून असल्याचा दावा पोलिसांनी केला असून, सर्वोच्च न्यायालय आता दुसरी बाजू जाणून घेणार आहे. त्यासाठी आरोपी पंप मालकांना नोटिसा बजावण्याचे काम ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक १ ने सुरू केले आहे. पंप मालक आणि आॅइल कंपन्यांच्या प्रतिनिधींसह या प्रकरणाशी संबंधित ३५ जणांना नोटिसा बजावल्या जात आहेत.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपfraudधोकेबाजीnewsबातम्या