शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदर महापालिकेसमोर नोटा उधळल्या; २५ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल

By धीरज परब | Updated: May 27, 2023 14:45 IST

नवीन ठेकेदाराने पूर्वीच्या अनेक कंत्राटी कामगारांना कमी करत नवीन कर्मचारी नेमले आहेत.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयातल्या खोल्या प्रशासनाने रिकामी करायला लावल्या म्हणून पूर्वीच्या ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात येऊन नोटा उडवत निषेध आंदोलन केले. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत २२ ते २७ जणांवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या सफाई व देखभाल करणाऱ्या कंत्राटी कमर्चारीसाठी प्रत्येक शौचालयाच्यावर खोली बांधलेली आहे.  २०१७ साली पालिकेने सदर शौचालयांची सफाई व देखभालचे काम लोकसेवा नागरी सहकारी संस्थेला तर २०१९ साली शाईन मेटेंनन्स सर्व्हिसला दिले होते. त्या दरम्यान ठेकेदारा मार्फत साफसफाई व नियोजनासाठी नेमलेल्या व्यक्ती ह्या कुटुंबासह शौचालय वरील खोलीत रहात होत्या. २०२३ साली सदर कंत्राट स्वामी समर्थ सिक्युरिटी हॉस्पिटॅलिटी या ठेकेदारास दिले आहे. 

नवीन ठेकेदाराने पूर्वीच्या अनेक कंत्राटी कामगारांना कमी करत नवीन कर्मचारी नेमले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या ठेकेदाराने नेमलेल्या लोकांना शौचालयातेली खोली रिकामी करण्यास पालिकेने लेखी कळवले होते. मात्र अनेकांनी खोल्या खाली न केल्याने प्रशासनाने महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांच्या सोबत जाऊन खोल्या रिकामी करून घेतल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी शुक्रवारी महापालिका मुख्यालयात येऊन निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यातील एका व्यक्तीने गळ्यात नोटांची बंडल अडकवून मुख्यालयात लोकांसह फिरून पालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तसेच प्रवेशद्वारावर नोटा हवेत उडवत खळबळ माजवली. नोटा उडवत पालिकेचा निषेध करणाऱ्यांनी खाली पडलेल्या नोटा पुन्हा गोळा करून घेतल्या. 

सुरक्षा रक्षकांनी त्यांना विरोध केला . तर या प्रकरणी महापालिकेच्या फिर्यादी वरून भाईंदर पोलिसांनी हेमंत कानाबार व गीता कानाबार सह अन्य २० ते २५ महिला व पुरुषांवर सरकारी कामात अडथळा आणण्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे . महापालिकेची मालमत्ता असून सदर कामगार हे खोली , लाईट, पाणी सर्व मोफत वापरत होते . घरामध्ये एसी, फ्रीज, कूलर, वॉशिंग मशीन आदींचा वापर केला जात होता व वीजबिल पालिका भारत होती . काहींनी तर खोल्या भाड्याने दिल्या . त्यामुळे प्रशासनाने नवीन ठेकेदारास खोलीचे चार हजार भाडे, वीज व पाणी बिल भरण्याची अट टाकली आहे .  त्यातच नवीन ठेकेदारा कडे काम करत नसताना देखील पालिकेच्या खोल्या कब्जा करून बसलेल्याना बाहेर काढल्याने त्यांनी हा गोंधळ घातला. - रवी पवार, उपायुक्त, महापालिका