शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत आचारसंहितेलाच ‘नोटा’

By admin | Updated: April 21, 2017 00:07 IST

निवडणुकीत एखादा उमेदवार पसंत नसेल, तर यापैकी कुणीही नाही अर्थात ‘नोटा’ वापरण्याचा अधिकार मतदारांना असतो

भिवंडी : निवडणुकीत एखादा उमेदवार पसंत नसेल, तर यापैकी कुणीही नाही अर्थात ‘नोटा’ वापरण्याचा अधिकार मतदारांना असतो. तसाच ‘नोटा’ म्हणजे नकाराधिकार भिवंडी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वापरायचा ठरवल्याप्रमाणे भिवंडीतील वातावरण असून निवडणुकीचे आदेश जारी होऊनही आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत कामालीची उदासीनता असल्याचे दिसून आले. शहरभर सर्वत्र राजकीय पक्षांचे बॅनर, फलक , पोस्टर, झेंडे कायम आहेत. एवढेच नव्हे, तर सरकारी वाहनांवरील, इतर गाड्यांवरील राजकीय पक्षांची चिन्हे, झेंडेही डौलाने फडकत आहेत. पालिकेच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक कार्यालयाने अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या. पण त्यानुसार काम सुरूच झालेले नाही. राजकीय पक्षांपेक्षा अधिकाऱ्यांनाच निवडणूक लांबणीवर जाते की काय अशी उत्सुकता असल्यासारखे कामात शैथिल्य आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतरही विनापरवाना राजकीय पक्षांचे फलक झळकत आहेत. अनेक नगरसेवकांनी आपल्या गाड्यांवरील पालिकेचे मानचिन्ह काढलेले नाही. काहींनी गाडीवरील राजकीय पक्षाचे चिन्ह, झेंडे कायम ठेवले आहेत. प्रभाग कार्यालयाच्या आजूबाजूस राजकीय पक्षाचे बॅनर आहेत. आचारसंहिता लागू होताच कशापद्धतीने कामे करायची याचे नियोजन नसल्याने आचारसंहितेचे बिनदिक्कत उल्लंघन होत आहे. निवडणूक कार्यालयांतून आतापर्यंत ६० मतदारयाद्या विकल्या गेल्या आहेत. परंतु सारे काम पालिकेच्या मुख्य कार्यालयांतून सुरू असल्याने अधिकारी शोधूनही सापडत नाहीत. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गुड्डू हुकूमशहा : महापालिका निवडणूक जाहीर होताच पक्षातील वादांनाही तोंड फुटायला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष खालीद गुड्डू यांच्याविषयी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत असून ते हुकूमशहाप्रमाणे पक्षाचे निर्णय घेत असल्याचा आरोप शहर कार्यकारिणीतील खजिनदार सिद्राम श्रीगिरी यांनी औपचारिक चर्चेत केला. जुन्या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम किंवा बैठकीस न बोलविता परस्पर निर्णय घेतात. मुख्य कार्यकारिणीची बैठक होत नाही. पदाधिकाऱ्यास विश्वासात न घेता परस्पर नेमणूका केल्या जातात. याचा जाब वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी न विचारल्याने त्याचा फटका निवडणुकीत बसणार असल्याचे श्रीगिरी यांनी सांगितले. या बाबत शहराध्यक्ष खालीद गुड्डू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी होऊ शकला नाही.मनसेची तयारी सुरू : निवडणूक जाहीर होताच मनसेने पदाधिकारी आणि उमेदवारांची बैठक घेऊन जेथे पक्षाची ताकद आहे, तेथील लढतीबाबत चर्चा केली. पक्षाने दोन महिने अगोदरपासून तयारी सुरू केली होती. त्या रणनीती ठरवण्यात आल्याची माहिती मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष मदन पाटील यांनी सांगितले. सेनेची मदार याचिकेवर : मतदारयाद्यांतील दुबार नावांबरून उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेकडे शिवसेनेचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख संजय काबूकर हेही एक याचिकाकर्ते आहेत. न्यायालयाच्या निकालानंतरच हालचालींना वेग येईल अशी माहिती शहर जिल्हाप्रमुख सुभाष माने यांनी दिली.