शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

संरक्षक भिंत नाही; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By admin | Updated: September 11, 2015 01:02 IST

शहराला पूर्व-पश्चिम जोडणारा अवघा एक उड्डाणपूल असून त्यावरून अखंड वाहतूक सुरू असते. पश्चिमेला शास्त्रीनगर भागात तीन शाळा आहेत. त्यांचे शेकडो विद्यार्थी याच

- अनिकेत घमंडी,  डोंबिवलीशहराला पूर्व-पश्चिम जोडणारा अवघा एक उड्डाणपूल असून त्यावरून अखंड वाहतूक सुरू असते. पश्चिमेला शास्त्रीनगर भागात तीन शाळा आहेत. त्यांचे शेकडो विद्यार्थी याच हमरस्त्यावरून ये-जा करत असतात. ट्रक, डम्पर यासह केडीएमटी, एनएमएमटी आणि अन्य वाहनांमुळे उड्डाणपुलाच्या उतारावरून येताना एखाद्या वेळेस वाहनाचा ब्रेक फेल झाल्यास मोठा अपघात होऊ शकतो. त्या ठिकाणी महापालिकेने संरक्षक भिंत बांधलेली नाही. नगरसेवकाने कागदी घोडे नाचवले, परंतु त्यास महापालिकेने प्रतिसाद दिलेला नाही. याच ठिकाणाहून वाशी/बेलापूर व अन्य ठिकाणी एनएमएमटीच्या तसेच केडीएमटीच्या बसेस जातात. हजारो प्रवासी त्याचा लाभ घेतात. मात्र, त्यांना उभे राहण्यासाठी चांगला बसथांबा नसल्याने प्रवाशांची आबाळ होते. परंतु, वॉर्डात केडीएमटी-परिवहन सेवा मात्र नागरिकांना मिळू शकलेली नाही. कचराकुंडीमुक्त वॉर्ड शक्य झाला नाही. त्यामुळे घंटागाडी येऊनही कचऱ्याची समस्या आहेच. परिसरात भटक्या कुत्र्यांची समस्या वाढलेली असून त्यामुळेही नागरिक-वाहनचालक भयभीत आहेत. रात्री-अपरात्री एकटी व्यक्ती आढळल्यास अथवा वाहन जोराने नेल्यास कुत्री मागे लागतात. काही वेळेस चावाही घेतात. अशा स्थितीमुळे नागरिक त्रस्त आहेत. रेल्वे स्थानकालगतच हा परिसर येत असल्याने या ठिकाणी फेरीवाल्यांची समस्या जटील असून त्यावर नियंत्रण मिळवताना नगरसेवकाच्या नाकीनऊ आले आहे. ४-५ धोकादायक इमारती असून तेथे मालक-भाडेकरू यांच्यात समन्वयाचा अभाव असून नगरसेवक त्यात मध्यस्थी करू न शकल्याने समस्या जैसे थे आहे.याच परिसरात शास्त्रीनगर रुग्णालय आहे. ठिकठिकाणांहून पेशंट्स येत असल्याने त्यांनाही सुविधा मिळत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक त्या ठिकाणी जातच नाहीत. काही ठिकाणची गटारे अद्यापही उघडी आहेत. या ठिकाणी पाण्याची, ड्रेनेजची समस्या सोडवली. ब्रीजच्या ठिकाणी संरक्षक भिंतीसंदर्भात एच वॉर्ड अधिकाऱ्यांना सांगितले, त्यांनी काही केलेले नाही. यूटीडब्ल्यूटीअंतर्गत रस्ता या ठिकाणी झाला. भटक्या कुत्र्यांची समस्या आहे. वाशी बसथांबा सुधारावा, यासाठी आधी माजी मंत्री गणेश नाईक यांनी निधी दिला होता. आता परिवहन सभापतींना साकडे घातले आहे. - रणजित जोशी, नगरसेवक