शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट नव्हे ही तर नकली सिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:20 IST

स्मार्ट ठाणे आजही कागदावरच; सहा महिन्यांत रिक्त पदांची भरती

ठाणे : एकीकडे ठाणे महापालिका स्मार्ट सिटी, डीजी ठाण्याचा गाजावाजा करत असताना दुसरीकडे अनेक विभागांचा कारभार हा संगणकाविनाच सुरू असल्याची गंभीर बाब बुधवारी झालेल्या महासभेत उघड झाली. त्यामुळे ही स्मार्ट सिटी, डीजी ठाणे नसून हे नकली ठाणे असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते हणमंत जगदाळे यांनी लगावला. महापालिकेत येत्या काळात किती पदे रिक्त होणार, असा प्रश्न शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश मणेरा यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात उपस्थित केला. यावेळी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वेळकाढू उत्तर देऊन संगणकात सर्व डाटा फिड आहे. परंतु, तो कागदावरच द्यावा लागेल आणि त्यासाठी वेळ लागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रशासनाच्या या उत्तराने नगरसेवक संतप्त झाले.महापालिकेत अधिकारी आणि कर्मचारी अशी मिळून दोन हजार ५१३ पदे रिक्त असल्याची माहिती प्रशासनाने दिली. येत्या काळात आणखी १४७ पदे रिक्त होणार आहेत. परंतु, ती नेमकी पदे कोणती, असा प्रतिसवाल मणेरा यांनी केला. त्याचे उत्तर आपल्याकडे नसून मी माहिती घेऊन ते देते, असे कार्मिक अधिकारी वर्षा दीक्षित यांनी स्पष्ट केले. परंतु, त्याची माहिती तत्काळ देण्याची मागणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केली.अनेक अधिकाऱ्यांवर अतिरिक्त भार : अनेक अधिकाºयांवर पाच ते सहा विभागांची अतिरिक्त जबाबदारी आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी अतिरिक्त कार्यभार एखाद्या अधिकाºयाकडे देता येत नाही. परंतु, नियम पाळले जात नसल्याचा टोला नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी लगावला. स्मार्ट ठाणे, डीजी ठाणे हे सर्व नकली ठाणे असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या ६२ अधिकाºयांवर अतिरिक्त कार्यभार आहे, अशी माहिती देण्यात आली. जी रिक्त पदे आहेत, ती केव्हा भरणार, असा प्रश्न मणेरा यांनी केला असता सहा महिन्यांत टप्प्याटप्प्याने भरली जातील, असे प्रभारी आयुक्त उन्हाळे म्हणाले.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीthaneठाणे