शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
3
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
4
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
5
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
6
मोहम्मद सिराजने लावला पिंपल पॅच? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, असं होतं त्वचेचं संरक्षण
7
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
8
VIRAL : जत्रेतल्या ब्रेकडान्सवर बसायला आवडतं? 'हा' व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी स्वतःला थांबवाल!
9
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
10
Viral Video: १५ पत्नी, ३० मुले आणि १०० नोकर! विमानतळावर आफ्रिकन राजाचा थाट पाहून सगळेच चक्रावले
11
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
12
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
13
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
14
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
15
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
16
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...
17
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला
18
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
19
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
20
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!

Electricity Update: ठाण्यात बत्ती गुलमुळे ‘नो वर्क फ्रॉम होम’; ऑक्टोबर हीटमध्ये अंघोळीलाही लागली ‘बत्ती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 00:35 IST

ऑनलाइन शिक्षणाला खो, ठाणे शहरातील घोडबंदर रोडचा काही भाग, वागळे इस्टेट, बाळकुम ढोकाळी आणि कोपरी, कळवा, मुंब्रा, दिवा यासह इतर भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.

ठाणे : कळवा-पडघा केंद्रातून वीजपुरवठा करणाऱ्या ग्रीडमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सकाळी १० वाजल्यापासून मुंबईसह ठाणे शहरातील अनेक भागांतील बत्ती गुल झाली होती. दुपारनंतर काही भागांचा वीजपुरवठा सुरळीत झाला, तर काही भागांमध्ये सायंकाळी उशिरापर्यंत विजेचा पत्ता नव्हता. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे घरून काम करणाºया कर्मचाऱ्यांना व ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरवणाºया विद्यार्थ्यांना याचा फटका बसला. ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाºया टेमघर येथील व ठाणे महापालिका आणि स्टेम प्राधिकरणाचे पूर्ण पंपिंग स्टेशन बंद झाल्याने शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद होता.

महापारेषणच्या ४०० केव्ही कळवा-पडघा जीआयएस केंद्रात सर्किट-१ ची देखभाल, दुरुस्ती करत असताना, त्याचा सर्व भार सर्किट-२ वर होता. मात्र, सर्किट-२ मध्येच अचानक बिघाड झाल्याने मुंबई व ठाण्यातील अनेक भागांमध्ये सकाळी १० च्या सुमारास अचानक वीजपुरवठा बंद झाला. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने खासगी क्षेत्रातील अनेकजण आजही ‘वर्क फ्रॉम होम’ करीत असताना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अचानक सकाळपासून बत्ती गुल झाल्याने घरून काम करणाºयांची चांगलीच पंचाईत झाली. घरातील नेट कनेक्शन बंद पडणे, लॅपटॉप चार्ज न केल्याने सुरू न होणे या प्रकारांनी अनेकांची डोकेदुखी वाढली. त्यातच लॉकडाऊनमुळे मेंटेनन्स न झाल्याने घरातील इन्व्हर्टरने दगा दिल्याने अनेकांवर घरात घाम पुसत महावितरणला शिव्याशाप देण्याची वेळ आली. आॅनलाइन शिक्षणाचे धडे गिरविणाºया विद्यार्थ्यांनादेखील या गोंधळाचा फटका बसला.

दरम्यान, ठाणे शहरातील घोडबंदर रोडचा काही भाग, वागळे इस्टेट, बाळकुम ढोकाळी आणि कोपरी, कळवा, मुंब्रा, दिवा यासह इतर भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. घोडबंदरमधील काही भागांचा वीजपुरवठा सुरळीत होता. ठाणे शहरातील काही भागांचा वीजपुरवठा दुपारी सुरळीत झाला.अत्यावश्यक सेवेतील रेल्वे प्रवाशांचे हालवीजपुरवठा खंडित झाल्याने रेल्वेसेवेवर त्याचा परिणाम झाला होता. सध्या रेल्वेसेवा सर्वांकरिता उपलब्ध नसली, तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी उपनगरीय लोकलची वाहतूक ठप्प झाल्याने रेल्वे डब्यांत अडकले. डब्यांमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने उकाड्याने प्रवासी अक्षरश: हैराण झाले. अनेकांनी रेल्वेडब्यांतून रुळांवर उड्या ठोकून पायी चालत प्रवास सुरू केला.

टॅग्स :electricityवीज