शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपातीचे नो टेन्शन, पाऊस लांबल्यास टँकर द्या!- शंभूराज देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2023 07:20 IST

'लोकमत'च्या बातमीची पालकमंत्र्यांकडून दखल

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : सध्या जिल्ह्यातील जलसाठ्यांत जूनअखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे  पाणीकपातीचे संकट नाही. पाऊस लांबल्यास पर्यायी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्याचे आदेश ठाणे जिल्हा पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

बुधवारी ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाईचा विषय ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल पालकमंत्र्यांनी घेतली.

जिल्ह्यातील जलसाठ्यांच्या स्थितीची माहिती देसाई यांनी जिल्हा प्रशासनाकडून घेतली. सर्व पलिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यावेळी सूचनाही केल्या. तर वादळ, अतिवृष्टी, दरड कोसळल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत करणे, या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागासह पोलिस यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महिला बचत गट प्रक्रियेत न आलेल्या महिलांना प्रोत्साहित करणे, महिला  बचत गटाचे सहकार्य वाढवणे ते काम पालिका, नगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्र करण्याचे नियोजन करावे, असेही देसाई यांनी सांगितले.

खर्चाचा नियमित आढावा घेणार

जिल्ह्यातील खर्चाचे नियोजन केले असून, वेळोवेळी कामांचा व खर्चाचा आढावा घेण्यात येणार आहे. जिल्हा नियोजनाचा खर्च १०० टक्के वेळेत कसा होईल, कामे वेळेत कशी सुरू होतील? वेळेत कशी पूर्ण होतील, दर्जेदार कशी होतील या सगळ्या गोष्टींकडे पालकमंत्री म्हणून माझे लक्ष असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाई