शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छताच नाही, मग बिले का द्यायची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 01:14 IST

परिवहन समितीच्या बैठकीत सदस्यांचा सवाल : देयक ांच्या प्रस्तावांना दिली स्थगिती

कल्याण : केडीएमटी बसची स्वच्छताच होत नाही. मग, झाडू मारल्याच्या कामाची बिले का मंजूर करायची, असा सवाल भाजप सदस्य संजय मोरे आणि संजय राणे यांनी गुरुवारी परिवहन समितीच्या बैठकीत केला. बसची स्वच्छता होत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने झाडूकामासंदर्भातील आठ विषय तूर्तास स्थगित ठेवण्यात येत असल्याचे सभापती मनोज चौधरी यांनी जाहीर केले.

केडीएमटीतील बसची स्वच्छता करण्यासाठी दैनंदिन झाडू मारण्याच्या कामाचे कंत्राट मे. आशा इंजिनीअरिंग वर्क्स यांना देण्यात आले आहे. या कंत्राटदाराने केलेल्या कामांच्या बिलांचे प्रस्ताव गुरुवारी झाडलेल्या परिवहनच्या बैठकीत सादर करण्यात आले होते. यावेळी प्रमुख कारागीर तथा प्रभारी कार्यशाळा व्यवस्थापक तृषांत मुळीक यांनी माहिती देताना सकाळ-सायंकाळ अशा दोन वेळेला झाडू मारला जात असल्याचे सांगितले. त्यावर मोरे यांनी हरकत घेतली. झाडू मारण्याचे काम होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. या कामाचे कंत्राट दिले असताना त्यावर उपक्रमाने नियंत्रण ठेवणारा अधिकारी नेमला होता का, असा सवालही मोरे यांनी केला. त्यावर कारागीर सुभाष साळुंखे यांची नेमणूक सुपरवायझर म्हणून केली होती, असे मुळीक यांनी सांगितले.

परंतु, साळुंखे काम करतात का, असा सवाल राणे यांनी मुळीक यांना केला. साळुंखे यांच्याबाबतीत कोणतीही तक्रार नाही, असे स्पष्टीकरण मुळीक यांनी देताच मोरे यांनी हरकत घेत साळुंखे यांना मग समज का देण्यात आली , असा सवाल केला. यावर समाधानकारक उत्तर मुळीक यांना देता आले नाही. अखेर, सर्वच सदस्यांनी केलेल्या मागणीवरून आठही प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आले.बिले उशिरा का आली? : बसचे जुने टायर, कट रिपेअरिंग, रिमोल्डिंग, टायर चेंजर मशीनची दुरुस्ती, सुटे भाग बदलणे, हब किट, व्हील डिस्क, ब्रेक पॅड कीट दुरुस्ती आदी कामांची २०१७ ची बिलेही गुरुवारी मंजुरीसाठी दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी चार प्रस्ताव होते. चर्चेच्या वेळी मोरे यांनी बिले दोन वर्षांनंतर मंजुरीसाठी का आणली गेली, असा सवाल केला. यावर मुळीक यांनी संबंधित कंत्राटदारांकडून ती उशिराने आल्याचे सांगितले. ही बिले ६७ हजार ते साडेपाच लाखांपर्यंत असल्याने सध्या हे प्रस्ताव स्थगित ठेवून विशेष बैठक बोलवाली, अशी मागणी मोरे यांनी केली.

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याण