शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नो प्लास्टिकचा संदेश देणारे पोस्टर्स वाटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 06:43 IST

सरकारने राज्यात प्लास्टिकबंदी घोषित केल्यानंतर पिशव्यांसह इतर प्लास्टिक उत्पादन आणि वापरावर बंदी घातली आहे. या बंदीची जनजागृती करण्यासाठी डॉ. बेडेकर शुश्रूषालय आणि स्वत्व या संस्था ‘नो प्लास्टिक’चा संदेश देणारे पोस्टर्स ठाणेकरांना मोफत देणार आहेत.

ठाणे -  सरकारने राज्यात प्लास्टिकबंदी घोषित केल्यानंतर पिशव्यांसह इतर प्लास्टिक उत्पादन आणि वापरावर बंदी घातली आहे. या बंदीची जनजागृती करण्यासाठी डॉ. बेडेकर शुश्रूषालय आणि स्वत्व या संस्था ‘नो प्लास्टिक’चा संदेश देणारे पोस्टर्स ठाणेकरांना मोफत देणार आहेत.जोपर्यंत नागरिक उत्स्फूर्तपणे यात सहभागी होत नाहीत, तोवर कोणताही समाजाभिमुख उपक्र म यशस्वी होऊ शकत नाही, हा विचार समोर ठेवून डॉ. बेडेकर शुश्रूषालय आणि स्वत्व यांनी प्लास्टिकबंदीविषयी जनजागृती करणारी पोस्टर्स बनवली आहेत. ती जागरूक आणि जबाबदार नागरिकांसाठी विनामूल्य दिली जाणार आहेत. ती गृहसंकुले, कार्यालये आणि आपल्या परिसरातील लहानमोठी दुकाने अशा ठिकाणी लावू शकता, असे आवाहन डॉ. बेडेकर रुग्णालय आणि स्वत्वने ठाणेकरांना केले आहे. स्वत्वच्या कलाकारांनी ही पोस्टर्स तयार केली असून ती डॉ. बेडेकर रुग्णालयात उपलब्ध आहेत. ज्यांना इथे येऊन हे पोस्टर्स घेणे शक्य नाही, त्यांनी mahesh_bedekar@yahoo.com, projectswatva@gmail.com   या ई-पत्त्यावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. या पोस्टर्समध्ये मुलगी वडिलांना आणि मुलगा आईला प्लास्टिक वापरू नका, असे सांगत असल्याचे दाखवले आहे. बंदी जाहीर झाल्यापासून आम्ही या उपक्रमासंदर्भात विचार करत होतो. गेल्या दोनतीन दिवसांपासून स्वत्वचे कलाकार हे पोस्टर्स बनवण्याचे काम करत आहेत.आतापर्यंत एक हजार पोस्टर्स मराठी आणि इंग्रजी भाषेत तयार केली आहेत. आणखी बनवली जातील, असे स्वत्वच्या संस्थापिका अ‍ॅड. स्वाती दीक्षित यांनी सांगितले.सरकारने बंदी आणल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास होत आहे. त्यामुळे जनजागृती करणारे पोस्टर्स बनवावे, ही संकल्पना सुचली. यासाठी श्रीपाद भालेराव यांना फोन करून त्यांच्याकडून ती तयार करून घेतली. नुसती बंदी आणून चालत नाही, त्यात लोकसहभाग महत्त्वाचा असतो, म्हणूनच स्वत्व आणि बेडेकर रुग्णालयाच्या वतीने ठाणेकरांना मोफत पोस्टर्स वाटले जाणार आहेत. पालकांना त्यांचे महत्त्व पटले, तर त्यांची जबाबदारी वाढून त्यांच्या पाल्यांचेही प्रबोधन होईल. हे पोस्टर्स प्रथम गावदेवी भाजी मंडईत लावले जाणार आहेत.- डॉ. महेश बेडेकर, डॉ. बेडेकर शुश्रूषालयसध्या आम्ही नो प्लास्टिक ही मोहीम हाती घेतली आहे. नंतरच्या टप्प्यात पर्यायाचा विचार केला जाईल.- अ‍ॅड. स्वाती दीक्षित, संस्थापिका, स्वत्व

टॅग्स :thaneठाणेPlastic banप्लॅस्टिक बंदी