शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

"राज ठाकरे यांच्यावर कोणीही बोलणार नाही", शिंदे सेनेची भूमिका

By अजित मांडके | Updated: July 7, 2025 17:58 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात न बोलण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे सेनेतील प्रवक्ते व नेत्यांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात न बोलण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे सेनेतील प्रवक्ते व नेत्यांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. मात्र त्यावर शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी शिक्कामोर्तब केले आहे. राज ठाकरे आमच्याबद्दल काहीही बोलले नाहीत, त्यामुळे आम्ही देखील त्यांच्याबद्दल बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत शनिवारी हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी उध्दव सेना आणि मनसेच्या वतीने आयोजित केलेला विजयी मेळावा शनिवारी वरळीत पार पडला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील प्रवक्ते आणि नेत्यांना राज ठाकरे यांच्यावर कोणत्याही प्रकारची टिका किंवा बोलू नये असे आदेश दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यांच्या या बोलण्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. परंतु म्हस्के यांनी याचे स्पष्टीकरण केले आहे.

मेळाव्यात राज ठाकरे यांनी न कोणता झेंडा फक्त मराठीचा अजेंडा अशा स्वरुपात आपले भाषण केले. मात्र उद्धव ठाकरे यांनी मात्र शिंदे सेनेवर आगपाखड केल्याचे दिसून आले. त्यामुळेच आता राज ठाकरे यांच्यावर किंवा यांच्या विरोधात बोलण्याचा विषय काय येतो, असा सवाल म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. ना कुठला पक्ष, ना कुठला झेंडा अशी त्यांची भूमिका होती, मात्र उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्ती, मराठी भाषा सोडून खालच्या पातळीची टीका केली, मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी भाषण केले, उद्धव ठाकरे हे हारलेले दिसून आल्याची टीका म्हस्के यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलतांना केली.

राज ठाकरे आमच्याबद्दल काही बोलले नाहीत म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, मात्र उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्ही बोलत राहू असेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी अतिशय गलिच्छ पद्धतीने भाषण करुन उसन अवसान आणले, महाराष्ट्र, मराठी माणसांवर अन्याय असे भडकावून निवडणुका लढवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची टिकाही त्यांनी केली. मराठी माणसांना भडकावून त्यांची मत मिळवणे हाच त्यांचा उद्देश असल्याचे दिसून आले. तुमची एक हिंदी भाषिक खासदार आहे. प्रियांका चुर्तुवेदी यांना दोन शब्द मराठीत बोलता येत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

दोन महिन्यापूर्वीच मी सांगितले होते, की शिल्लक सेनेत कोणीही राहणार नाही, शनिवारी झालेल्या मेळाव्यात किती आमदार, खासदार उपस्थित होते, याचे उत्तर त्यांनीच द्यावे असेही ते म्हणाले. यावेळी म्हस्के यांनी राऊत यांचाही समाचार घेतला, राऊत यांनीच उद्धव ठाकरे यांचे वाटोळे केल्याची टिकाही त्यांनी केली. काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत नेऊन काय वाटोळं केल हे सर्वांना माहित आहे, आता त्यांना काँग्रेस सोबत राहायचं आहे का, आणि काँग्रेसला यांच्यासोबत राहायचं आहे का असा प्रश्न राहिलेला आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारणnaresh mhaskeनरेश म्हस्केShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे