शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाडा शहरात दुचाकी-चारचाकींना नाही अधिकृत वाहनतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 00:29 IST

मुख्य रस्त्यांवरील पदपथांवर वाहनांचे अतिक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : वाडा शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी एकही अधिकृत वाहनतळ नसल्याने बाजारात साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना शहरातील मुख्य रस्त्यांवरील पदपथावर वाहने उभी करण्याची वेळ आली आहे. त्याचा नाहक त्रास पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

वाडा शहराची लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तालुक्यातील विविध खेडेगावांतून मोठ्या संख्येने दुचाकी, चारचाकी वाहनधारक येत असतात. हे वाहनचालक वाहनतळाअभावी रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करून बाजारात खरेदीसाठी जात असल्याने वाहतूककोंडी होत आहे. खंडेश्वरी नाका ते परळी नाका या ७०० मीटर अंतरावर नेहमीच वाहतूककोंडी होत असते. या वाहतूककोंडीचा त्रास या मार्गावरील पदपथावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना होत आहे. वाडा शहरातील मुख्य बाजारपेठेतून नाशिककडे जाणाऱ्या वाडा - देवगांव रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. मात्र, रुंदीकरण करण्यात आलेल्या जागेवर बाजारात सामान खरेदीसाठी येणारे दुचाकीस्वार व चारचाकी वाहनधारक आपली वाहने पदपथावरच उभी करीत असतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतूककोंडी होत असते. शहरात नगर पंचायतीच्या मालकीच्या काही जागा आहेत.  या जागा ताब्यात घेऊन नगर पंचायतीने ‘पे अँड पार्कʼ या धर्तीवर वाहनतळ सुरू करावे, अशी मागणी नगर पंचायतीचे विरोधी पक्षनेते मनीष देहरकर यांनी केली आहे.

शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या पदपथावर वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई होणे आवश्यक आहे. नगर पंचायतीने कायद्याचा बडगा दाखवावा.- कुणाल साळवी, ग्रामस्थ, वाडा

टॅग्स :thaneठाणे