शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘परिवहन’कडून ‘ना-हरकत दाखला’- मंत्री दिवाकर रावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 01:52 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण स्टेशन परिसराचा विकास करण्यास परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मंजुरी दिली आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण स्टेशन परिसराचा विकास करण्यास परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मंजुरी दिली आहे. स्टेशन परिसरातील बस डेपोच्या विकासाला परिवहन खात्याकडून ‘ना-हरकत दाखला’ मिळाला नसल्याने या कामाचे गाडे पुढे सरकत नव्हते. रावते यांच्या उपस्थितीत मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत दाखला दिला जाणार असल्याचे सांगितले. स्टेशन परिसराच्या विकासाची निविदा महिनाभरात काढली जाईल, असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. स्टेशन परिसरातील बस डेपो आणि मेट्रो रेल्वेचे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रस्तावित रेल्वेस्थानक जोडले जाणार आहे. बस डेपोत बसगाड्या वर आणि खाली पार्किंग व रिक्षा यांच्यासाठी सोय असेल. मात्र, परिवहन खात्याकडून त्यासाठी ना-हरकत दाखला मिळत नव्हता. त्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने परिवहन खात्याकडे पाठवला होता. यासंदर्भात रावते यांच्याकडे बैठक घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत ंिशंदे व आ. रवींद्र फाटक यांनी पाठपुरावा केला. तसेच स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनीही प्रयत्न केले.रावते यांच्याकडे शनिवारी पार पडलेल्या बैठकीत आयुक्त गोविंद बोडके, महापौर राजेंद्र देवळेकर, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी आणि तरुण जुनेजा आदी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेअंती रावते यांनी बस डेपो विकासासाठी ना-हरकत दाखला देण्याचे मान्य केले. दाखला मिळाल्याने स्टेशन परिसर विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. महिनाभरात स्टेशन परिसर विकासाची निविदा मागवली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत २८ प्रकल्प विकसित करण्याची यादी तयार केली आहे. त्यानुसार, एरिया बेस डेव्हलपमेंटअंतर्गत २० प्रकल्प तर पॅन सिटीअंतर्गत आठ प्रकल्प विकसित केले जाणार आहेत. एरिया बेस डेव्हलपमेंटमध्ये कल्याण स्थानक परिसराच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. कल्याण स्टेशन परिसराचा विकास करण्यासाठी मध्य रेल्वेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या विकासकामांवर ४०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

टॅग्स :kalyanकल्याण