शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात दूरदृष्टीचा अभाव; राज ठाकरे यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 21:58 IST

ठाण्यातील एका नेत्रालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राजकारणी नेत्यांकडे दृरदृष्टीचा अभाव असल्याचे प्रतिपादन केले.

ठळक मुद्दे नेत्रालयाचे उद्घाटनकोरड्या चेहऱ्यांचे काय करायचे?राज यांचा ठाण्यातील कार्यक्रमात सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : नेत्ररोगतज्ज्ञ असो, डेन्टिस्ट अथवा अन्य कोणताही डॉक्टर त्यांच्याकडे दूरदृष्टी असते. राजकारणात मात्र दूरदृष्टीचा अभाव प्रकर्षाने जाणवत असल्याची खंत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात व्यक्त केली. ही खंत व्यक्त करतानाच अशा दूरदृष्टीच्या लोकांनी राजकारणात आले पाहिजे, असेही ते म्हणाले.घोडबंदर रोडवरील मानपाडा येथील एका नेत्रालयाच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे रविवारी ठाण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी आपले मत व्यक्त केले. जवळ असलेलेही राजकारण्यांना दिसत नाहीत. ड्राय (कोरड्या) झालेल्या डोळ्यांच्या आजारावर उपचार होतील, पण कोरड्या चेहºयांचे काय करायचे, असा सवाल करून उपस्थितांचे लक्ष वेधले. एखाद्या रुग्णालयाच्या, रुग्णवाहिकेच्या किंवा अशा नेत्रालयाच्या उद्घाटनाला गेल्यानंतर काय बोलावे, हाही प्रश्न पडतो, असे बोलून त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. लहान मुलांचे नंबर वाढण्याला त्यांच्या हातातील मोबाइल हेही एक कारण असल्याचे ते म्हणाले. डॉक्टर हा देवानंतरचा अवतार असल्याचे सांगत त्यांनी डॉ. नितीन देशपांडे यांच्याबद्दल गौरवोद्गारही काढले.ज्येष्ठ संगणक अभ्यासक अच्युत गोडबोले, ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती सुधाकर चव्हाण, ठाणे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आर.टी. केंद्रे आदींसह अन्य डॉक्टर यावेळी उपस्थित होते..............................राज यांच्या फोटोसाठी धडपडराज ठाकरे घोडबंदर रोडवरील एका नेत्रालयाच्या उद्घाटनासाठी आले असल्याची वार्ता मनसैनिकांसह सामान्य नागरिकांमध्ये पसरल्यानंतर कार्यक्रम संपण्याची वाट पाहत त्यांचे अनेक कार्यकर्ते ‘दोस्ती इम्पेरिया’ या इमारतीखाली उभे होते. ते बाहेर पडल्यानंतर तन, मन, धनसे फक्त मनसे मनसे... अशा घोषणा त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यानंतर, ते गाडीमध्ये बसेपर्यंत अनेक तरुणांनी त्यांचा फोटो क्लिक करण्यासाठी मोबाइल समोर घेतले. मनसेचे नेते अभिजित पानसे, जिल्हाप्रमुख अविनाश जाधव, मनविसे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे, शहराध्यक्ष रवी मोरे आणि शाखाध्यक्ष संतोष निकम आदी यावेळी उपस्थित होते.

 

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटलPoliticsराजकारण