शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गटबाजी आणि कुरबुरी नको, टीमवर्क हवे; राजेश टोपेंनी कार्यकर्त्यांना दिल्या कानपिचक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 00:04 IST

जनमानसात संघटना बळकट करण्याचे आवाहन

कल्याण :  एकमेकांची उणीदुणी काढू नका, अंतर्गत गटबाजी नको, कुरबुरीही नको, टीमवर्क हवे अशा शब्दांत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मंगळवारी कानपिचक्या लगावल्या. स्थानिक पातळीवर पक्ष क्षीण झाला आहे. पक्ष वाढला पाहिजे. केडीएमसीच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत, जनमानसात जाऊन काम करा, पक्ष संघटन बळकट करा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

पश्चिमेतील खडकपाडामधील एका क्लबमध्ये मंगळवारी विशेष बैठक पार पडली. कल्याण डोंबिवली शहर जिल्हा निरीक्षक म्हणून टोपे आणि आमदार विद्या चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.  या वेळी आनंद परांजपे, जगन्नाथ शिंदे, सुभाष पिसाळ, प्रमोद हिंदूराव, रमेश हनुमंते आदी स्थानिक नेत्यांसह अन्य प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करताना टोपे म्हणाले, कल्याण डोंबिवलीत प्रत्येक जिल्ह्यातून लोक राहायला आले आहेत. संघटन मजबूत असणे गरजेचे आहे. हाच बैठकीमागचा मुख्य उद्देश आहे. जनतेसाठी काम करा. त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळतोच. संघटन बळकट होण्यासाठी कार्यकर्ता सक्रिय असला पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी मार्गदर्शन केले.

लवकरच जिल्हाध्यक्षांची निवड

रिक्त असलेल्या कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष पदाबाबत बोलताना टोपे यांनी लवकरच जिल्हाध्यक्ष निवडला जाईल, असे बैठकीत स्पष्ट केले. या वेळी त्यांनी जिल्हाध्यक्षपद भूषविलेल्या रमेश हनुमंते यांच्या कामाचे कौतुकही केले. पक्ष संकटात असताना हनुमंते यांनी पक्षवाढीचे काम केले. त्यांनी आता वरिष्ठ पातळीवर पक्षाचे काम करावे अशी नेत्यांची इच्छा असल्याचे टोपे म्हणाले.

शिंदे यांना जिल्हाध्यक्षपदासाठी पसंती

कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षपदासाठी माजी आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या नावाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. यासंदर्भात मंगळवारच्या बैठकीत बहुतांश जणांनी टोपे यांना निवेदने दिली आहेत. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिंदे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात यावी, असा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.‘

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपे