शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

निधी नाही; तरीही नगर पालिकेची कोटींची उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2015 23:25 IST

अंबरनाथ नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर झालेली पहिलीच सर्वसाधारण सभा वादात अडकली आहे. आर्थिक तरतुदीपेक्षा चारपट जास्त विकास कामांना मंजुरी देण्याचा प्रताप पालिकेने केला आहे

पंकज पाटील, अंबरनाथअंबरनाथ नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर झालेली पहिलीच सर्वसाधारण सभा वादात अडकली आहे. आर्थिक तरतुदीपेक्षा चारपट जास्त विकास कामांना मंजुरी देण्याचा प्रताप पालिकेने केला आहे. मंजुरी दिलेल्या विकास कामांच्या खर्चाचा आकडा हा २५० कोटींच्या घरात असून तिजोरीत अवघे ६० कोटीच शिल्लक असल्याने ही सर्व कामे रखडणार आहेत. अंबरनाथ पालिकेच्या अर्थसंकल्पाला बगल देऊन कोटी -कोटींची कामे मंजूर करुन घेऊन शहरात विकास कामे करण्याचे स्वप्न अंबरनाथ पालिकेतील सत्ताधारी पाहत आहेत. पहिल्याच सर्वसाधारण सभेत २५० कोटीपेक्षाही जास्तीच्या विकास कामांना मंजुरी दिली. मात्र ती देतांना पालिकेची आर्थिक स्थिती पाहण्यात आलेली नाही. या मंजूर विकास कामांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्यावर खरे सत्य अंबरनाथकरांपुढे आले. मंजूर कामांसाठी किती आर्थिक तरतूद शिल्लक आहे याचा खुलासा जिल्हाधिकाऱ्यांनी मागितल्यावर पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना अडचणीत सापडली आहे. जो पर्यंत मंजूर विकास कामांचा अर्थसंकल्पीय तरतुदीसोबत ताळमेळ बसत नाही तोपर्यंत ती स्थगित ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. विकासकामांसाठी प्रतीक्षा : अशा परिस्थितीत मंजूर कामांपैकी कोणती कामे अर्थसंकल्पीय तरतुदीत बसवायची याची चाचपणी मुख्याधिकाऱ्यांनी सुरु केली आहे. अर्थसंकल्पातील मंजूर निधीप्रमाणे विकास कामे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्यावरच शहरात कामे करता येणार आहेत. सर्वसाधारण सभेत २५० कोटींची कामे मंजूर आहेत. मात्र पालिकेकडे अवघे ६० कोटीच शिल्लक आहे. त्यामुळे १९० कोटींच्या विकास कामांसाठी नगरसेवकांना आणि अंबरनाथकरांना प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे. २५० कोटींची विकास कामे मंजूर करतांना आर्थिक तरतूद होईल त्या प्रमाणे कामे करण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने सभागृहात दिले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिल्यावर याच प्रशासनाने लेखी पत्र देऊन या कामांसाठी केवळ ६० कोटींची तरतूद असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे प्रशासनाने नगरसेवकांची आणि सभागृहाची दिशाभूल केली आहे.