शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

स्वाध्याय परिवाराच्या निर्मलाताई आठवले कालवश

By admin | Updated: February 1, 2017 02:45 IST

स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, पद्मविभूषण, टेम्पलटन आणि रॅमन मेगसेसे पुरस्कार विजेते, कृतिशील तत्त्वचिंतक पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पत्नी निर्मलाताई आठवले

ठाणे : स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, पद्मविभूषण, टेम्पलटन आणि रॅमन मेगसेसे पुरस्कार विजेते, कृतिशील तत्त्वचिंतक पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पत्नी निर्मलाताई आठवले (९०) यांचे सोमवारी सायंकाळी ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठातील त्यांच्या घरी निधन झाले. बुधवारी दुपारी ४ वा. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. निर्मलातार्इंचा जन्म ३ आॅगस्ट १९२६ रोजी गावखडी, जि. रत्नागिरी येथील सिधये कुटुंबात झाला. १९४४ साली पांडुरंगशास्त्रींशी विवाह झाला होता. निर्मलातार्इंनी केवळ दादांचा संसारच नव्हे, तर त्यांच्या स्वाध्याय परिवाराच्या रचनात्मक कार्यातही त्यांनी भक्कम साथ दिली. लाखो स्वाध्यायींची माऊली असूनही त्यांनी कधीही स्वत:चे व्यक्तिमत्त्व पुढे न करता, दादांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वामध्ये विरघळून जाणेच पसंत केले. स्वाध्याय कार्यातील बंधू-भगिनींना, तसेच तत्त्वज्ञान विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन कायम लाभत होते. दादांच्या देहावसनानंतर ताई ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठात वास्तव्यास होत्या. तार्इंच्या जाण्याने स्वाध्याय परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी तत्त्वज्ञान विद्यापीठात ठेवण्यात आले आहे. बुधवारी दुपारपर्यंत त्यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. दुपारी ४ वा. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. (प्रतिनिधी)