शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोविड केअर सेंटरसाठी नऊ कोटी ६७ लाख मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 02:41 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका : स्थायी समितीची आॅनलाइन सभा

कल्याण : केडीएमसीच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी आॅनलाइनद्वारे पार पडली. या सभेत कोरोना रुग्णांसाठी उभारलेल्या कोविड केअर सेंटर व विलगीकरण कक्षासाठी नऊ कोटी ६७ लाख रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीचे सभापती विकास म्हात्रे यांनी समितीच्या सभागृहातून सर्व सदस्यांशी आॅनलाइनद्वारे संपर्क साधला. या सभेला शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

डोंबिवली क्रीडासंकुलातील कोविड केअर सेंटर व रुग्णालयाच्या कामासाठी तीन महिन्यांसाठी ५६ लाख ३४ हजार रुपये, पाच महिन्यांच्या खर्चासाठी ७१ लाख ९९ हजार रुपये, तर सहा महिन्यांच्या खर्चास ७९ लाख ८२ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. डोंबिवली जिमखाना येथे उभारण्यात येत असलेल्या कोविड रुग्णालयास तीन महिन्यांसाठी एक कोटी ६४ लाख रुपये, चार महिन्यांसाठी एक कोटी ८९ लाख रुपये, पाच महिन्यांसाठी दोन कोटी १३ लाख रुपये खर्चास मान्यता दिली आहे. डोंबिवली जिमखान्यात कोविड सेंटरसाठी वीजपुरवठा व जनरेटरच्या सुविधेसाठी एक कोटी ३० लाख रुपये आणि ९१ लाख रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.याशिवाय, टिटवाळा परिसरातील विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी ४८ लाख २८ हजार रुपये, ‘जे’ प्रभागातील विलगीकरण कक्षासाठी १० लाख ७३ हजार रुपये खर्चास मान्यता दिली आहे.‘जे’ प्रभागात अन्य एका ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी २५ लाख ५५ हजार रुपये खर्चास मंजुरी दिली आहे. यापैकी डोंबिवली क्रीडासंकुलातील कोविड सेंटर सुरू झालेले आहे.दरम्यान, डोंबिवली पूर्वेतील जिमखाना येथील कोविड रुग्णालय अद्याप सुरू होणे बाकी आहे. हे सेंटर १० आॅगस्टपर्यंत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.धोकादायक इमारती पाडण्याच्या निविदेस मंजुरीच्मनपा हद्दीतील धोकादायक व अतिधोकादायक इमारती पाडण्यासाठी निविदा मागवण्यात आली होती. या कामासाठी आलेली देविदास चव्हाण यांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. त्यांच्या दरपत्रकानुसार धोकादायक व अतिधोकादायक इमारती पाडण्याचे काम केले जाणार आहे.च्महापालिका दरपावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारती पाडण्याच्या नोटिसा संबंधित मालकांना देते. मात्र, अनेकदा इमारतधारक इमारत पाडून घेत नाहीत. त्यामुळे आता कंत्राटदाराकडून या इमारती पाडल्या जाणार आहेत.च्सध्या कोरोना परिस्थितीत इमारती पाडून नागरिकांना बेघर करू नये. हाताला काम नसल्याने अनेक जण चार महिन्यांपासून घरात आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या घरावर हातोडा चालविणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे