शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नायजेरियन नागरिकांचा पुन्हा त्रास

By admin | Updated: October 10, 2016 03:16 IST

चार वर्षांपूर्वी मीरा-भार्इंदरसह वसई-विरारमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी हुसकावून लावले होते.

भार्इंदर/मीरा रोड : चार वर्षांपूर्वी मीरा-भार्इंदरसह वसई-विरारमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी हुसकावून लावले होते. मात्र, आता पुन्हा मीरा रोडच्या नागरिकांना त्यांचा त्रास होऊ लागला आहे. याविरोधात हाटकेश शिवसेना शाखाप्रमुख महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परिसरात निदर्शने करण्यात आली.मीरा-भार्इंदरसह वसई-विरार परिसरात चार वर्षांपूर्वी मोठ्या संख्येने नायजेरियन नागरिक बेकायदा वास्तव्य करीत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे वारंवार येत होत्या. परंतु, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांचा उच्छाद वाढू लागला होता. त्यातच, त्यांचे उद्योगही बेकायदा असल्याने स्थानिकांना त्याचा त्रास होऊ लागला होता. अनेक नायजेरियन तात्पुरता व्हिसा मिळवतात. मुदत संपल्यानंतरही वास्तव्य करून मादक द्रव्यांची तस्करी करीत असल्याचे अनेकदा उघड झाले. तत्कालीन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांनी धडक कारवाई केली. त्यांनी बहुतांश नागरिकांना शोधून ताब्यात घेतले होते. कायदेशीर बाबी पूर्ण करून त्यांना पुन्हा त्यांच्या देशात परत पाठवले होते. आता पुन्हा नायजेरियन नागरिकांच्या बेकायदा वास्तव्याला सुरुवात झाल्याने मीरा रोडच्या हाटकेशमधील रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यातच, काही घरांत बेकायदा पार्ट्या रात्रभर सुरू असतात. येथील मंगलनगर परिसरातील रुईया, पांडव, युधिष्ठिर, भीम यासह आसपासच्या काही इमारतींत मोठ्या संख्येने नायजेरियन नागरिक भाडेतत्त्वावर बेकायदा वास्तव्य करीत आहेत. त्यातच भाड्याने घर देताना आवश्यक असलेला पोलिसांचा नाहरकत दाखलाही इमारतीच्या सोसायटी कार्यालयात जमा केला जात नाही. गुपचूप घर भाड्याने देत घरमालक पसार होत असल्याने त्यांना घराबाहेर काढण्यास स्थानिकांना अडचणीचे ठरत आहे. याविरोधात स्थानिकांनी काशिमीरा पोलिसांत तक्रारी केल्यानंतरही त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी शिवसेनेचे शाखाप्रमुख शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परिसरात रविवारी निदर्शने केली. निदर्शनात विभागप्रमुख विलास सूर्यवंशी, उपशाखाप्रमुख राजेंद्र पडवळ, शंकर यादव, मंगेश मोरे, महिला विभाग संघटक सोनाली वाघमारे, सुनंदा देसाई आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)