शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील नाल्यात सापडले मगरीचे नवजात पिल्लू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 09:25 IST

पिल्लू जाळ्यात आले असावे ही शक्यताही नाकारता येत नाही. मार्श या प्रजातीच्या मगरी आपल्याकडे तुलसी तलाव आणि उपवनाच्या तलावात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वागळे इस्टेट येथील रामनगर परिसरातील नाल्यात एक दीड ते दोन आठवड्यांचे लहान मगरीचे पिल्लू सापडले आहे. मार्श प्रजातीच्या मगरीचे हे पिल्लू पुनर्वसू फाउंडेशन या वाइल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या निगराणीत आहे. अशा प्रकारे दोन वर्षांपूर्वी त्या नाल्याच्या परिसरात मगरीचे पिल्लू मिळून आले होते. या घटनांमुळे ही मगरीची पिल्ले कुठून येतात, याचा शोध घेणे गरजेचे आहे.

एक तर अशा प्रकारे या मगरीच्या पिल्लांना कोणी तरी आणून सोडत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मामा-भाचे डोंगराच्या पायथ्याशी रामनगर वसलेले आहे. त्याच परिसरातून जाणाऱ्या नाल्यात स्थानिकांना मगरीचे पिल्लू सोमवारी (दि. १४) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आले. त्यांनी तातडीने माहिती दिल्यावर पुनर्वसू फाउंडेशन या वाइल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यांनी धाव घेतली. तेथे गेल्यावर त्या जिवंत पिल्लाला ताब्यात घेऊन त्याची तातडीने वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी त्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे स्पष्ट झाले. 

मात्र हे पिल्लू नेमके कुठून आले तसेच त्याला कोणी येथे आणून सोडले असावे अशीच शक्यता आहे; कारण त्या नाल्यात मगर येणे खूप कठीण आहे. त्यातच मासे पकडताना ते पिल्लू जाळ्यात आले असावे ही शक्यताही नाकारता येत नाही. मार्श या प्रजातीच्या मगरी आपल्याकडे तुलसी तलाव आणि उपवनाच्या तलावात आहेत. हे पिल्लू ही त्याच प्रजातीतील आहे. त्या नवजात पाहुण्याची (पिल्लाची) काळजी घेतली जात आहे. डॉक्टरांच्या मदतीने याच परिसरात मागे सापडलेल्या पिल्लाप्रमाणे या नव्या पिल्लालाही सोडले जाणार असल्याचे असोसिएशनने सांगितले.

‘सापडलेल्या पिल्लाची वैद्यकीय तपासणी केली असून त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. ते व्यवस्थित असून त्याला आता सोडणे शक्य नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वनविभागामार्फत सोडण्यात येईल. ते अवघे दीड ते दोन आठवड्यांचे असून त्या एक फुटाच्या पिल्लाचे वजन १०० ग्रॅम आहे.- आदित्य पाटील, अध्यक्ष, पुनर्वसू फाउंडेशन

टॅग्स :thaneठाणे