शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाची सुरुवात गुन्ह्यांनी न करण्याचे केले आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:06 IST

कल्याण-डोंबिवलीत पोलीस सज्ज; हॉटेल, मॉल, दुकानेही सजली

कल्याण : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कल्याण-डोंबिवली सज्ज झाले आहे. पार्ट्यांसाठी विविध हॉटेलमध्ये बुकिंग सुरू झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अनुचित प्रकार घडून नववर्षात गुन्हे दाखल होऊ नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे.गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार असून बीटमार्शल आणि पीसीआर मोबाइलद्वारे गस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. परिमंडळ-३ मधील सर्व लॉज, हॉटेल, ढाबे, बार आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. मद्यप्राशन तसेच अमली पदार्थांचे सेवन करून मोठ्या प्रमाणात अपघात घडतात. या प्रकारांना आवर घालण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. तसेच ब्रेथ अ‍ॅनालायझरमार्फत चालकांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच, नववर्षाचे स्वागत करताना डीजेद्वारे ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील हॉटेल, मॉल तसेच मिठाई, केक आणि गिफ्ट यांची दुकाने सजली आहेत. हॉटेलमध्येही विविध खाद्यपदार्थांवर तसेच थाळीवर सवलती देण्यात आल्या आहेत. हॉटेलवर रोषणाई, सजावट करण्यात येणार असून संगीताचीही तयारी करण्यात आली आहे. यंदाची थर्टी फर्स्ट मंगळवारी आल्याने शाकाहारी खाद्यपदार्थांना विशेष पसंती मिळणार असल्याने काही नावीन्यपूर्ण मेन्यू तयार करण्यात आला आहे.चौकाचौकांत राहणार नजरनववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरातील चौकाचौकांत बंदोबस्त तैनात राहणार आहे. परिमंडळ-३ कल्याणमध्ये एकपोलीस उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक आणि सुमारे ४८० पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस यांचा समावेश असणार आहे.