शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

ठाण्यात नववर्ष यात्रेचा जल्लोष मर्यादित स्वरूपात; महिलांचा सहभाग लक्षणीय

By admin | Updated: March 29, 2017 05:19 IST

श्री कौपिनेश्वर मंदिरापासून पालखीचे पारंपारिक प्रथेनुसार प्रस्थान झाले. सुरूवातीला पालकमंत्री एकनाथ शिंदे व

ठाणे : श्री कौपिनेश्वर मंदिरापासून पालखीचे पारंपारिक प्रथेनुसार प्रस्थान झाले. सुरूवातीला पालकमंत्री एकनाथ शिंदे व स्वागताध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर हे पालखीचे भोई झाले होते. पालखी व इतर पादचारी जांभळी नाका-रंगो बापूजी चौक या मार्गाने दगडी शाळेकडे आले. चिंतामणी चौक येथे पालखी आल्यावर ‘स्वयंभू संस्कृती’ ढोलताशा पथकाने मानवंदना दिली. त्यानंतर तलावपाळीवर उभे असलेले चित्ररथ आपापल्या क्रमानुसार पालखीबरोबर येऊन या पालखीचे रुपांतर स्वागतयात्रेत झाले. ही स्वागतयात्रा पुढे गजानन महाराज चौक-हरीनिवास सर्कल येथे आल्यावर श्री कौपिनेश्वर महाराजांच्या पालखीवर पालकमंत्री शिंदे, महापौर मिनाक्षी शिंदे व खा. राजन विचारे यांनी पुष्पवृष्टी केली. यावेळी सहभागी ठाणेकरांनी ‘हर हर महादेव’, ‘कौपिनेश्वर महाराज की जय’ असा नारा दिला. तसेच, शंखही फुंकण्यात आले. त्यानंतर विष्णूनगर येथे पालखी आल्यावर या ठिकाणी ‘आम्ही ठाणेकर’ या ढोल ताशा पथकाने पालखीला मानवंदना देत सादरीकरण केले. त्यानंतर घंटाळी चौकात ‘रणगर्जना प्रतिष्ठान’ने मानवंदना दिली. यात प्रथमच सादर केलेला बर्ची हा प्रकार ठाणेकरांच्या पसंतीस पडला. स्वागतयात्रा घंटाळी चौक-गोखले मार्ग-समर्थ भांडारपर्यंत आल्यावर पुढे राम मारुती रोड-पु.ना.गाडगीळ चौक-तलावपाळीमार्गे पुन्हा श्री कौपिनेश्वर मंदिरात समाप्त झाली. स्वागतयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ््यांच्या पायघड्याही घालण्यात आल्या होत्या. कोणी टाळ तर कोणी लेझीम सादर केले. ठाणे महापालिकेचा ब्रासबॅण्डही यात सहभागी होता. लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकजण यात्रेत सहभागी झाले असले तरी महिलांचा सहभाग लक्षणीय होता. भगवा फेटा, नऊवारी साडी, नथ अशा वेशभूषेत बाईक रॅलीत सहभागी झालेल्या महिलांनी ‘बेटी बचाओ’चा संदेश दिला. रीना राजे आणि गौरी राजे या मायलेकींनी आपल्या बाईकवर पाळणा लावून ‘पाळणा बोलतोय’ अशा प्रकारची केलेली सजावट लक्ष वेधून घेणारी होती. सरस्वती क्रीडा संकुलाने दरवर्षीप्रमाणे जिम्नॅस्टीकचे सादरीकरण केले. स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’चा नारा दिला. सारा फाऊंडेशनने चित्ररथामध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ तर विश्वास गतिमंद संस्थेने ‘फुलपाखरु’ हा विषय सादर केला. आदर्श मैत्री प्रतिष्ठानतर्फे सहभागी झालेल्या मुलांनी हातात पाटी घेऊन ‘मराठी शाळा वाचवा’चा संदेश दिला. विविध राज्यांचे पोशाख परिधान करुन काही महिला बाईकवर स्वार झाल्या होत्या. (प्रतिनिधी)मॅक्सीकोच्या क्रिस्तीनाने लुटला स्वागतयात्रेचा आनंद : मेक्सीकोतून आलेल्या क्रिस्तीना कोपेल या महिलेने या स्वागतयात्रेचा मनमुराद आनंद लुटला. ठाणे फिरण्यासाठी आलेली ही महिला एका ठाणेकर डॉक्टरांसह आली होती. ते तिला या स्वागतयात्रेची माहिती देत होते. क्रिस्तीनाने आपल्याला स्वागतयात्रा खूप आवडली असून मेक्सीकोला गेल्यावर आप्तेष्टांना स्वागतयात्रेचे फोटो दाखविणार असल्याचे सांगितले. अशाप्रकारे एकत्र येऊन सण साजरा करणे, ही संकल्पनाच खूप छान असल्याचेही ती म्हणाली.सायकलवरून आलेल्या आजोबांसोबत सेल्फीसाठी गर्दी : खोपट येथे राहणारे ७८ वर्षीय देविदास ठोंबरे हे सायकलवरून स्वागतयात्रेत येताच बघ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. या आजोबांभोवती जमून अनेकांनी त्यांची माहिती घेतली व त्यांच्यासोबत सेल्फी काढले. आजोबांचा उत्साह हा तरुणाईला लाजवणारा होता. आतापर्यंत मी १९ सायकली बदलल्या असून, माझी ही वेशभूषा मी स्वत: तयार केल्याचे ते म्हणाले. मान्यवरांची उपस्थितीसभागृहनेते नरेश म्हस्के, आ. संजय केळकर, आ. रवींद्र फाटक, भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक नारायण पवार, नगरसेवक संजय वाघुले, नगरसेविका प्रतिभा मढवी, मृणाल पेंडस, अभिनय कट्ट्याचे प्रमुख किरण नाकती व इतर, तसेच न्यासाचे पदाधिकारी स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. स्वागतयात्रेतील चित्ररथ स्पर्धेचा निकालप्रथम - वनवासी कल्याण आश्रमद्वितीय - सारा फाऊंडेशनतृतीय - विहंग चॅरिटेबल ट्रस्ट / रोटरी क्लब आॅफ ठाणेउत्तेजनार्थ १ - पर्यावरण दक्षता मंडळउत्तेजनार्थ २ - भगिनी निवेदिता मंडळउत्तेजनार्थ ३ - महिलांची बाईक रॅली