शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षात ठाणेकर वळले पुन्हा एकदा बोटिंगकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:41 IST

ताणतणावातून बाहेर येण्याचा प्रयत्न 

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या ताणतणावातून बाहेर येण्यासाठी ठाणेकर नव्या वर्षात बोटिंगकडे वळले आहेत. लॉकडाऊन काळात ठाणेकरांचे बंद पडलेले बोटिंग पुन्हा सुरू झाले आहे. नव्या वर्षाच्या चार दिवसांत १२७ ठाणेकरांनी मासुंदा तलावात बोटिंगचा आनंद घेतला. बोटिंगसाठी येणाऱ्या कुटुंबांची संख्या पुन्हा वाढली आहे.

शनिवार-रविवार किंवा एखाद्या सार्वजनिक सुटीच्या दिवशी ठाणेकरांचे हमखास फिरण्याचे ठिकाण म्हणजे तलावपाळी. या ठिकाणी मासुंदा तलावात बोटिंगची व्यवस्था केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये आस्थापनांबरोबर बोटिंगही बंद केले. डिसेंबर महिन्यात बोटिंग सुरू केले असले तरी कोरोनामुळे पहिल्यासारखे लोक येत नसल्याचे येथील व्यवस्था पाहणाऱ्यांनी सांगितले. कोरोनामुळे येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान तपासले जात आहे, सॅनिटायझरचीदेखील व्यवस्था केली आहे. ठाणेकरांसोबत संवाद साधल्यावर त्यांनी सांगितले की, नववर्ष सुरू झाल्यावर कोरोनाचा ताण घालविण्यासाठी आम्ही बोटिंगसाठी कुटुंबासमवेत आलो आहोत. दर महिन्याला किंवा शनिवार-रविवारी हमखास लहान मुलांना घेऊन बोटिंगला येत अस

२९९ ठाणेकरांनी डिसेंबर महिन्यात बोटिंग केली. लॉकडाऊनआधी महिन्याला दीड हजारावर ठाणेकर बोटिंगला येत. हळुहळु हे प्रमाण वाढेल, असे येथील व्यावसायिकांना वाटते.

मुलांच्या मनोरंजनासाठी आम्ही बोटिंग केलीखूप दिवसांनी आल्याने पहिल्यासारखे वाटत आहे. कोरोनामुळे सर्वांचेच नुकसान झाले असल्याने या व्यवसायालाही हातभार लागला पाहिजे. लॉकडाऊनआधी दर आठवड्याला शनिवार-रविवारी यायचो.     - प्रीतिका गावडे

बोटिंग केल्यावर जुने दिवस आठवले. घराबाहेर पडल्याने ताजेतवाने वाटत आहे. लॉकडाऊनआधी महिन्यातून एकदा बोटिंग करायचो. एक वर्षाआधी ती केली होती.     - दीपक सोनार

याआधी आठवड्यातून एकदा तरी बोटिंगला यायचो. आज बोटिंगला जायचे ठरविले. गर्दी कमी असल्याने मजा येत नाही.- शैलेश कदम