शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कोरोनाच्या १,३८८ रुग्णांची नव्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 00:27 IST

ठाणे जिल्ह्यात ३३ जणांचा मृत्यू : आरोग्य यंत्रणेने दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ३८८ नव्या रुग्णांची मंगळवारी वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंंख्या एक लाख ६१ हजार ६५९ झाली आहे. तर ३३ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता चार हजार २०५ वर गेली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे ३२२ रुग्ण नव्याने आढळले. शहरात ३३ हजार ५२५ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे. तर चार मृत्यू झाले आहेत. यामुळे आतापर्यंत ९४२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर कल्याण - डोंबिवली परिसरात २९६ रुग्णांच्या वाढीसह सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत ३९ हजार ४६८ रुग्ण बाधित झाले असून मृतांची संख्या ७८० झाली आहे.

नवी मुंबईत २६४ रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या ३३ हजार ७५५ तर, मृतांची संख्या ७१० वर गेली आहे. उल्हासनगर महापालिका परिसरात तीन जणांचा मृत्यू झाला असून ४८ नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत मृतांची संख्या २७५ तर आठ हजार ७४८ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

भिवंडी महापालिका क्षेत्रात ३३ बाधित आढळले. तर एका मृत्यूची नोंद करण्यात आली. आता बाधितांची संख्या चार हजार ७८२ झाली असून मृतांची संख्या ३०२ झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये १८५ रुग्णांची तर चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या शहरात आता बाधितांची संख्या १६ हजार ८८६ झाली असून मृतांची संख्या ५२३ झाली आहे.

अंबरनाथमध्ये २५ रुग्णांची वाढ तर दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आता बाधितांची संख्या पाच हजार ८७३ तर मृतांची संख्या २१८ झाली आहे. बदलापूरमध्ये ४७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या पाच हजार ६६३ झाली. या शहरात मंगळवारी एकही मृत्यू झालेला नाही. यामुळे त्यांची संख्या ७६ कायम आहे.ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात मंगळवारी १६८ रुग्णांची वाढ झाली तर पाच मृत्यू झाले आहेत. त्यामुळे आता बाधितांची संख्या १२ हजार ९५९ आणि मृतांची संख्या ३७९ झाली आहे.