शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

डायघर-खिडकाळीत नवे घोडबंदर, ठामपाची पावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:19 IST

डायघर आणि परिसरातील खिडकाळी, पडले, देसाई व सागर्ली या गावांच्या एकात्मिक विकास योजना राबवण्याच्या दृष्टीने अतिरिक्त आयुक्तांनी या परिसराचा गुरुवारी पाहणी दौरा केला.

ठाणे : डायघर आणि परिसरातील खिडकाळी, पडले, देसाई व सागर्ली या गावांच्या एकात्मिक विकास योजना राबवण्याच्या दृष्टीने अतिरिक्त आयुक्तांनी या परिसराचा गुरुवारी पाहणी दौरा केला. यानंतर, आता या गावांच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात येणार असून या गावांना शहरी भागाशी जोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून तोे महासभेच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. दिवा भागाचा ज्या पद्धतीने विकास आराखडा तयार करून तेथील विकासकामांना नोव्हेंबर महिन्याच्या महासभेत मंजुरी मिळाली, त्यानुसार आता डायघर आणि आजूबाजूच्या गावांचा नवे घोडबंदर म्हणून येत्या काळात विकास करणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.या गावांचा विकास करत असताना येथील अनधिकृत बांधकामे ही पालिकेसाठी मोठा चिंतेचा विषय असून तो सोडवण्यासाठीसुद्धा हालचाली केल्या जाणार आहेत.डायघर आणि परिसरातील खिडकाळी, पडले, देसाई व सागर्ली या गावांच्या एकात्मिक विकासाच्या दृष्टीने ग्रामस्थांच्या वतीने नगरसेवक बाबाजी पाटील, संतोष किणे, संतोष पाटील, गणेश म्हात्रे, गोविंद भगत यांच्यासह ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन तेथील विकासकामांच्या अनुषंगाने चर्चा केली.त्यानंतर, या भागाचा पाहणी दौरा करण्याचे आदेश आयुक्तांनी दोनही अतिरिक्त आयुक्तांना दिले होते. त्यानुसार, गुरुवारी या दोघांनीही या भागाचा पाहणी दौरा केला. एकीकडे ठाणे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने प्रवास करत असताना दुसरीकडे मात्र महापालिका हद्दीत असूनही येथील बहुतांश भाग आजही कसा विकासापासून वंचित राहिला आहे, याची माहिती त्यांना या पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने मिळाली आहे.गटार, पायवाटा, रस्ते, शौचालये, दिवाबत्ती, आरोग्याच्या सोयीसुविधा यापासून ही गावे कोसो दूर असल्याची बाबही समोर आली.गावांची लोकसंख्या सुमारे दीड लाखांच्या आसपास असून येथील रहिवाशांना कोणत्या मूलभूत सोयीसुविधांची गरज आहे, याची माहिती यावेळी घेण्यात आली. त्यानुसार, त्याआधारे आता या गावांचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.>ही होणार विकासकामेविकास आराखड्यानुसार शीळ येथे उपप्रभाग कार्यालय निर्माण करणे, खिडकाळी आणि डायघर येथे दोन उद्यानांची निर्मिती करणे, खिडकाळी-डायघर येथे स्टेडिअम बांधणे व मैदाने विकसित करणे, शीळ आणि देसाई येथे आरोग्य केंद्रे बांधणे, पडले येथे ज्युनियर कॉलेज आणि शाळांची दुरुस्ती, डायघर येथील शाळेचे वाढीव मजल्याचे काम, देसाई येथे आरोग्य केंद्र, प्रसूतिगृह तसेच ट्रॉमा सेंटरचे बांधकाम, डायघर येथे आगरी समाजभवन बांधणे, या परिसरातील स्मशानभूमींचे सौंदर्यीकरण आणि विस्तारीकरण, परिसरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते बांधणे, पदपथ आणि विद्युतकामे, पाणीपुरवठा, मलनि:सारण आदी कामे येत्या काळात केली जाणार आहेत. यासाठी किती खर्च येऊ शकतो, त्यादृष्टीने हा विकास आराखडा तयार केला जाणार आहे.>अनधिकृत बांधकामांच्या जागेवर परवडणारी घरेया भागात सर्वात मोठी समस्या ही अनधिकृत बांधकामांची असून येथे सोयीसुविधांची वानवा असली, तरीही अनधिकृत बांधकामांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या बांधकामांचे करायचे काय, असा पेच सध्या पालिकेला सतावू लागला आहे. परंतु, या बांधकामांबाबत कोणती योजना राबवली जाऊ शकते, याचाही अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर, परवडणाºया घरांची योजना राबवता येऊ शकते का,याचीही चाचपणी केली जाणार आहे.